राजाभाऊ कोठारी यांचे प्रतिपादन; शिव मित्र प्रतिष्ठानच्या वतीने महाकुंभ मेळाच्या पवित्र तीर्थाचे पूजन व भाविकांना वाटप
नगर १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभ पर्वणीचा हा सोहळा अति दिव्य आहे. ज्यांच्या नशिबात या अति पवित्र पर्वणीचा लाभ होता ते प्रत्यक्ष तेथे जाऊन ती अनुभूती घेतली. पण जे प्रयागराजला जाऊ शकले नाहीत अशांचा विचार करून सुमित वर्मा व त्याच्या मित्रांनी तेथील पवित्र तीर्थ नगरला आणून आदर्शवत काम केले आहे. आजच्या या कलियुगात तरुणांची दिशा भरकटलेली असताना काही तरुण एकत्र येत आदर्शवत काम करतात हे धर्मकार्य कौतुकास्पद आहे. दुसऱ्यांसाठी काहीतरी केल्यावर मानव जन्माचे सार्थक होतं. सुमित वर्माने कायम मानवजातीसाठी काम केले आहे. याचा अभिमान आहे. भविष्यातही असेच धर्मकार्याचे उपक्रम सतत राबवावेत, असे आवाहन राजाभाऊ कोठारी यांनी केले. अहिल्यानगरचे सुमित वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या ४२ सहकाऱ्यांनी प्रयागराज या महामुंभ स्थळी जाऊन तेथील पवित्र तीर्थ नगरच्या भाविकांसाठी आणले आहे. नगरच्या शिव मित्र प्रतिष्ठानच्या वतीने गंगा, यमुना व सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमाचे पवित्र तीर्थाचे पूजन व भाविकांना तीर्थाचे वाटप बुधवारी सकाळी गंज बाजार येथे राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते गंगामैयाच्या जयघोषात झाले. यावेळी तीर्थ घेण्यास भाविक उपस्थित होते. यावेळी
हर हर गंगे… नमामि गंगे…, जय श्रीराम घोषणा देण्यात आल्या. प्रयागराजचे प्रवित्र तीर्थ घेण्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रास्ताविकात सुमित वर्मा म्हणाले, तब्बल १४४ वर्षांनी महाकुंभ मेळाची मोठी पर्वणी आपल्याला मिळाली हे आपले भाग्य आहे. या महाकुंभपर्वात आम्ही नगरहून ४२ जण सामील होण्यासाठी प्रयागराज तीर्थक्षेत्री गेलो होतो. गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमात स्नान
केल्यावर संगमाचे पवित्र जल नगरच्या भाविकांसाठी नेण्याचा निर्णय आम्ही घेतला. माझ्याबरोबर असलेल्या प्रत्येकाने ड्रममध्ये पवित्र जल भरून ते ड्रम हातात घेत गर्दीतून १८ किलोमीटरचा पायी प्रवास केला. नगरच्या अनेकांना इच्छा असूनही प्रयागराज तीर्थक्षेत्री जाता आले नाहीये. अशांसाठी व सर्व भाविकांना १४४ वर्षांनी आलेल्या पर्वणीचा लाभ व पुण्य मिळावे यासाठी आपुलकीने हे जल नगरला आणले आहे. प्रयागराज येथून आणलेल्या या गंगेचे राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते पूजन करून वाटप केले आहे. राजाभाऊ कोठारी यांच्याकडून धर्म कार्याची प्रेरणा व शिकवण मिळाली आहे. त्यानुसारच धर्मासाठी काम करत आहे. यावेळी प्रयागराजला गेलेले संकेत गुरव, यश मुथ्था, अमित सोनग्रा, आदित्य आनेचा, यश सावेकर, अमित लड्डा, दर्शन मुथ्था, श्रवण बोरा, सिद्धार्थ कांकरिया, संकेत रनसिंग, गौरव कांकरिया, ओम दळवी, अनमोल कांकरिया, आदित्य साके, प्रथम दळवी, कुणाल खंडेलवाल, सार्थक तिवारी, मयंक ‘डेलवाल, जिनेश चंगेडे, मयुर जाधव, सर्वेश चंगेडे, तनिष्क व्यास, शुभम मेहेर, मोहित गांधी, विनायक होनराव, पार्थ ठोकळ, निहांशू चेन्नुर, बाली जोशी, राहुल वर्मा, राहुल मेहेर, सुजित साळुंके, अक्षय भापकर, दर्शन बोरा, प्रीत कांकरिया, ओम पांडे, आशिष चंदेल, अलोक पारख, प्रेम देवळालीकर, ईशान दळवी, जतिन सहदेव, हर्ष कांकरिया, अनिकेत कुल्लळ, राजू थोरात व श्रीपाद डोळसे आदी उपस्थित होते