मुलांवर हिंदू संस्कृतीप्रमाणे संस्कार रुजवाव

आ. संग्राम जगताप यांचे आवाहन; तपोवन रोड येथील जेनियस ग्लोबल स्कूल या इंग्रजीमाध्यमाच्या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नगर – पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत मुलांमध्ये संस्काराची रुजवण करुन त्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. मुलांचा बौध्दिक विकास लहानपणी झाल्यास भविष्यात ही मुले पुढे जातात. इंग्रजी भाषेचे ज्ञान देतांना मुलांवर हिंदू संस्कृतीप्रमाणे संस्कार रुजविण्याचे आ. संग्राम जगताप यांनी आवाहन केले. तपोवन रोड, कजबे मळा येथील जेनियस ग्लोबल स्कूलचे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या चिमुकल्या
विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. शाळेच्या आवारात झालेल्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविले. कोळी नृत्य व महाराष्ट्रातील लावणी सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. हिंदी-मराठी गीतांवर वैयक्तिक व समुह नृत्याचे बहारदार सादरीकरण
करण्यात आले. आ. संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्नेहसंमेलाप्रसंगी यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ फिल्ड ऑफिसर रविराज पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे दक्षिण जिल्हाध्यक्ष इंजि. डी.आर. शेंडगे, जेनियस
एज्युकेशनचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सहसंचालक महेंद्र म्हसे, पूजाताई कजबे, शोभाताई दातीर, बाळासाहेब
कजबे, पांडुरंग गवळी, सानप सर, राहुल कजबे, शांताराम कजबे, अक्षय कजबे, जगदीश देशमुख, स्वाती
डोमकावळे, प्रकाश डोमकावळे आदी उपस्थित होते. रविराज पाटील यांनी विविध प्रदुषणांमुळे मानवी,
प्राणी आणि वस्पतीचे जीवन धोयात आले असल्याचे स्पष्ट करुन, विद्यार्थ्यांना प्रदुषणाचे दुष्परिणाम सांगितले.
तर प्रदुषणावर सनियंत्रण मिळवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. महेंद्र म्हसे यांनी या इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये होणार्‍या
उपक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणार्‍या
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व माता पालकाचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गुण गौरव करण्यात आला.
बाळासाहेब शेंडगे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची देऊन, वार्षिक अहवाल सादर
केला. तर शाळेचा वाढता
गुणवत्तेचा आलेख मांडला.
विविध हिंदी-मराठी गीतांवर
विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. विविध
गीतांवर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित
पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. सूत्रसंचालन
समृद्धी डोमकावळे व ज्योती म्हसे यांनी केले. महेंद्र म्हसे
यांनी आभार मानले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी
स्कूलच्या समन्वयक ज्योती म्हसे, उषाताई शेंडगे,
अश्विनी शेंडगे, उषा मसुरे, ज्योती शिंदे यांनी परिश्रम
घेतले

सत्कर्म करुन भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे

हभप अमोल महाराज जाधव यांचे प्रतिपादन; फुलसौंदर मळा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

नगर – अहिल्यानगर ही संताची भुमी
आहे. ज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रात अग्रेसर
आहे. आपल्याला उज्वल संस्कृतीचा वारसा
आहे. विविधतेत एकता ही भारताची संस्कृती आहे.
भारतीय संस्कृती पाश्चिमत्य देशाप्रमाणे आधारलेली
नसून, त्यागावर आधारलेली आहे. त्यासाठी सर्वांनी
अध्यात्माचा प्रचार व प्रसार करावा, त्यातुनच
मनुष्याला शांती लाभणार आहे. मनुष्य जन्म हा आपला
व आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी मिळालेला
आहे. या जन्मात आपण सत्कर्म करुन भगवंतांचे
नामस्मरण केले पाहिजे, त्यातुनच आपणास मुक्ती
मिळेल, असे मौलीक विचार हभप अमोल महाराज
जाधव यांनी मांडले.
बुरुडगांव रोड येथील फुलसौंदर मळा येथे
अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत काल्याची हंडी हभप
अमोल महाराज जाधव यांच्या हस्ते फोडण्यात
आली. याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,
भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, नगरसेवक
गणेश कवडे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, सुरेश
तिवारी, राजेंद्र फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, एल.के.
आव्हाड, अनिल ठोकळ, कारभारी सुपेकर, इंजि.अनिल साळूंके,
सुधीर बाफना, संजय चाफे, पुरुषोत्तम चाफे, ऋषिकेश चाफे आदि
उपस्थित होते.
पुढे बोलतांना जाधव महाराज म्हणाले, आजच्या धावपळीच्या
जीवनात मनुष्य एवढा व्यस्त झाला आहे की, आपण कुठे
चाललो, काय करतो याचे भान राहिले नाही; त्यामुळे मनुष्यास
शांती मिळत नाही. मनुष्यास जर समाधान, शांती पाहिजे असेल
तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. गेल्या २६ वर्षांपासून भगवान
फुलसौंदर हे सप्ताहाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना हा
मोठा लाभ मिळवून देत आहे. त्यामुळेच सप्ताहातील किर्तने, प्रवचने
ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. राजकीय, सामाजिक
व धार्मिक क्षेत्रातील फुलसौंदर यांचे कार्य उत्तरोत्तर वाढव राहो, असे
ते म्हणाले.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, गेल्या २६ वर्षांपासून या
सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून, भाविकांचाही त्यास मोठा
प्रतिसाद मिळत असतो. परिसरातील नागरिकांना आध्यात्मिकेतेचा
लाभ व्हावा, यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार,
प्रवचनकारांची अमृतवाणीचे पर्वणी देत आहोत. त्याचबरोबर
मंडळाच्यावतीने सामाजिक उपक्रमही राबविले जात असतात. तसेच
वर्षभर मंडळाच्यावतीने वृक्षारोपण, गुणवंतांचा
सत्कार, योग शिबीरे अशा सामाजिक
उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
याप्रसंगी विष्णू फुलसौंदर म्हणाले, आज
मनुष्य शिकून कितीही मोठा झाला तरी त्याला अनेक
बाबतीत आध्यात्माचा आधार घ्यावा लागतो. प्रगती
करावी परंतु आपली संस्कृती, इतिहास हा जपला
पाहिजे. संत विचार हे आजही आपणास मार्गदर्शक
ठरत आहे. त्यासाठीच गेल्या २६ वर्षांपासून हा
ज्ञानयज्ञ सुरु असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,
अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात
आला. सप्ताह काळामध्ये संतसेवा केली. त्यांचा
सन्मान करण्यात आला. यावेळी उकृष्ट रांगोळी
काढल्याबद्दल आर्किटकट अपर्णा फुलसोंदर,
पोपट राऊत, राजेंद्र फुलसोंदर, संजय चाफे आणि
पुरुषोत्तम चाफे, दिंडे आदींचा सन्मान करण्यात
आला. काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ
अनेक भाविकांनी घेतला. सप्ताह यशस्वीतेसाठी
महाशिवरात्री उत्सव समिती व वैष्णव मित्र मंडळाच्या
कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी हभप विश्वनाथ राऊत, संभाजी कदम, सचिन जाधव,
सचिन शिंदे, दत्ता कावरे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, गजानन ससाने,
अशोकराव कानडे, पांडुरंग नन्नवरे, मधुकर शिंदे, बाळासाहेब जाधव,
कुंडलिक गदादे, अनिल इवले, प्रभाकर भांबरे आदींसह भाविक
उपस्थित होते. काल्याचे कीर्तनाचे महाप्रसादाचे संजय चाफे आणि
पुरुषोत्तम चाफे यांच्यावतीने करण्यात आले.
सूत्रसंचालन भास्करराव गायकवाड यांनी केले तर अवधूत
फुलसोंदर यांनी आभार मानले.

केडगावला लाभलेला परिसस्पर्श…. आदरणीय भानुदासजी कोतकर साहेब

१ मार्च म्हटलं की आदरणीय भानुदास कोतकर साहेब यांचा  वाढदिवस आठवला आणि त्यांच्या विषयी कृतज्ञतेचे विचार मनात न कळत येत गेले त्याच विचारांना शब्दांचे पाठबळ देऊन त्यांच्याविषयी काही मनमोकळेपणाने लिहावे असं वाटल.
त्यांच्या कार्यकर्तृत्वाला शब्दबद्ध करण्याचा एक अल्पसा प्रयत्न हेच माझ्या मते वाढदिवसानिमित्त त्यांचे
अभिष्टचिंतन ठरु शकते. कोतकर साहेब खरोखरच एक कणखर प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. साहेबांच्या नावातच
सर्वश्रेष्ठ अशी निसर्गशक्ति दैवीशक्ति प्राप्त आहे. भानु म्हणजे सुर्य. जी सृष्टीतील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे व
या शक्तीचा दास म्हणजेच भानुदास. आजपर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक  कार्यपुर्तीतून निश्चितच ही दैवी शक्ती
दिसून येते. साहेबांचा जन्म केडगांव येथील एका सर्वसामान्य शेतकरी  कुटुंबात झालेला असल्याने सुरुवातीच्या
काळात अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले. गरीबीचे चटके बसत होते. अशा परिस्थितीतच ऐरणीवरील घाव सोसीत
तावून सलाखून निघत असतानाच एक कणखर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडत गेले. काही माणसे उपजतच
त्यांच्या घराण्यातील वारसानुसार चालत आलेल्या उच्चतेमुळे श्रीमंती व प्रतिष्ठेमुळे मोठेपणा प्राप्त करतात. परंतु काही
माणसे मात्र कुठलाही वारसा घराणेशाही नसताना स्व-कर्तृत्वाने मोठी होतात. कोतकर साहेब हे एक त्याचे मुर्तीमंत
उदाहरण आहे. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणही अल्पच मिळाले. तथापि भल्याभल्यांना ही मागे टाकतील असे ज्ञान त्यांच्याकडे होते. त्यांच्या प्रगतीची ओळख पाहिली तर अति उच्च विद्याविभूषीत व्यक्तिलाही लाजवेल अशा
प्रकारची प्रगती साहेबांनी केलेली आहे. नेतृत्व, निर्णयक्षमता, उपक्रमशिलता, दुरदृष्टी, सचोटी, अचूकता, वक्तृत्वशैली,
शिक्षणाविषयी जाण, सांस्कृतितेविषयी तळमळ, नियोजन, कोणतेही काम वेळेतच उच्चतम दर्जाचे करण्याचे आग्रह,
तत्परता, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे गुण आहेत. यापूर्वीच्या कालखंडामध्ये . राजकीय क्षेत्रात
काम करत असताना सर्वसामान्यांचा नेता म्हणून साहेबांची ओळख आहे. राजकीय प्रवास केडगांवमध्ये .
सुरु केल्यानंतर केडगांवमधील . व्यक्तींना जणू मोठा भाऊ मिळाला म्हणून लोक त्यांना भाऊ म्हणून ओळखू लागले. सर्वसामान्यांचा नेता म्हणून साहेबांची ओळख आहे. खेड्यापाड्यातील
तळागाळातील कार्यकर्ते घडविण्याचे,
जीवनामध्ये सक्षमपणे उभा करण्याचे
का त्यांनी केले. साहेबांनी १९८७ साली
केडगांव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून
अऔर ३३ प्रभावीपणे कार्य केले. तसेच
शारिरीक व्यायाम नियमितपणे करणे,
पोहणे, सायकलिंग, तालीम याची आवड
असल्याने स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवून
अनेक मल्ल घडविण्याचे काम त्यांनी
केले.
कोतकर साहेब सर्वसामान्यांसाठी
सकाळी उठल्यानंतर १२ ते १६ तास
काम करायचे. त्यांच्यामध्ये प्रचंड
इच्छाशक्ति, प्रामाणिकपणा, स्पष्टोक्ती,
निर्भिडपणा यामुळे साहेब जीवनात
यशस्वी झाले. गरिबीची जाणीव असल्या
कारणाने कायम तळमळ, अनेक
छोटेमोठे कारखाने, शिक्षणसंस्था, कृषी
उत्पन्न बाजार समिती, महानगरपालिका,
पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या
माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार
उपलब्ध करुन दिला.
कोतकर साहेबांच्या राजकीय
प्रवासामुळे केडगावचा विकास झाला.
केडगांवचा पाणी प्रश्न, रस्ते, ड्रेनेज,
स्ट्रिटलाईट, अनेक समाजोपयोगी
कार्य केल्याने केडगांव विकसित झाले.
केडगांव हे महानगर पालिकेत गेल्यानंतर
कोतकर साहेबांनी नगरसेवक आणि
आपले चिरंजीव संदिप यांना महापौर
असताना केडगांवला
प्रगतीपथावर नेले.
केडगांवचे कोथरूड
करण्याचे स्वप्न
साहेबांचे होते.
त्याच दृष्टीकोनातून
अल्पावधीतच .
केडगांवला विविध
विकास योजना
आणून आज
केडगांव मध्ये
जागेचे दर अनेक
पटीने वाढले आहे.
तसेच केडगांव मध्ये
गोरगरिबांना कर्ज
उपलब्ध होण्यासाठी भैरवनाथ पतसंस्था
स्थापन केली. गोरगरिबांच्या मुलांना
शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या मनात
शिक्षणाविषयी तळमळ होती. १९९३
मध्ये भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीची
स्थापन करुन भाग्योदय माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालय, केडगांव, तसेच
प्राथमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमाचे
विद्यालय सुरु करुन ज्ञानदानाचे
पवित्र कार्य चालू आहे. या शिक्षण
संस्थेच्या माध्यमातून शिक्षणांची गंगा
घरोघरी पोहचविण्याचे काम साहेबांच्या
माध्यमातून होत आहे. पंचायत समितीचे
१९९६ साली उपसभापती असताना व
त्यानंतर सभापतीपद मिळाल्यावर नगर
तालुयातील अनेक गावांत विविध
विकास योजना राबविल्या. घरकुल
असतील, रस्ते, बंधारे, पाझरतलाव,
जि.प.शाळा, आणि प्राथमिक आरोग्य
केंद्र या माध्यमातून कार्य केले. तसेच
कृषी उत्पन्न बाजार समिती, अ.नगर येथे
संचालक पद ते सभापती असा प्रवास
केला. आणि कृषी उत्पन्न बाजार समि
तीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला.
केडगांव बायपास येथे ६७ कोटी रुपये
खर्चून नेप्ती उपबाजार समिती सुरुवात
करण्यात आली.
हॉटेल व्यवसाय कसा करावा याचे
मूर्तीमंत उदाहरण कोतकर साहेब आहेत.
१९८१ साली हॉटेल लोकसेवा नावाने
एक छोटासा ढाब्याची सुरवात करुन तेथे
२५ पैशात चपाती, १ रुपयात भाजी,
देण्याचे काम त्यांनी केले. जेवणाची चव
त्यामुळे ग्राहक आकर्षित झाले. लोकांची
सेवा लोकसेवा हा भाऊंचा विचार. हाच
विचार पुढील हॉटेल व्यवसायामध्ये
प्रगतीपथावर घेऊन गेला.
केडगांव, अहमदनगर, पुणे
शहरात खाद्य संस्कृतीमध्ये मानाचा
पुरस्कार प्राप्त करणारे, महाराष्ट्रतील
खाद्य संस्कृतीचे सुपरस्टार हे साहेब
आहेत. क्वॉलिटी, विनम्र सेवा, स्वच्छता
यामुळे संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे
त्यांचे हॉटेल आहेत.
कोतकर साहेब यांनी आजारावर
मात करुन यशस्वी जीवन जगले आहेत.
आजही साहेबांमध्ये कमालीची शिस्त
आहे. साहेबांचे व्यक्तिमत्व वज्राहून
अधिक कठीन वाटत असले तरीही
त्यांच्या हृदयात मायेचा ओलावा निश्चित
आहे. त्यामुळेच त्यांच्याविषयी मनात एक
आदराची भावना निर्माण झाल्याशिवाय
राहत नाही. साहेबांकडे कुठल्याही
विद्यापीठाची डिग्री नसताना उत्तम
मॅनेजमेंट कसे करावे त्याचे उदाहरण
म्हणजे कोतकर साहेब. पंढरपूर येथे
धार्मिक वारसा टिकवण्यासाठी भैरवनाथ
देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भव्य
वारकरी भवन निर्माण केले. केडगांवमध्ये
अनेक देवालय उभारण्याचे काम केले.
कोतकर साहेबांनी सामाजिक,
राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, शेती,
उद्योग, व्यवसाय या क्षेत्रातील केलेले
कार्य छायाचित्रासह या पुस्तकामध्ये
आम्ही मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत.
थोडयात कोतकर साहेबांचे जीवन
चरित्र यामध्ये आपणासाठी प्रकाशित
करीत आहोत. त्यांच्या जीवनातील
दुर्मिळ अशी माहिती व फोटो उपलब्ध
करुन हे पुस्तक तयार करीत आहोत.
आपणास हे नक्कीच आवडेल ही अपेक्षा.
साहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे
साक्षिदार आम्ही आहोत. साहेबांविषयी
कृतज्ञतेचा भाव व्यक्त करुन त्यांना
वाढदिवसांच्या शुभेच्छा देऊन म्हणावेसे
वाटते आप जियो हजारो साल, साल के
दिन हो पचास हजार आदरणीय भाऊंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

कोठला स्टॅण्ड परिसराच्या राज चेंबर येथील ६ दुकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त

नोटीस बजावूनही अतिक्रमण न काढल्याने महानगरपालिकेची कारवाई

नगर – महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत
गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे
बांधण्यात आलेली सहा दुकाने, हॉटेल्स जमीनदोस्त केले. राज चेंबर परिसरात
पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. शहरात बेकायदेशीरपणे
साइड मार्जिन न सोडता, पार्किंगसाठी जागा न सोडता, महानगरपालिकेची परवानगी न घेता खासगी जागेत, रस्त्यावर,
रस्त्यालगत बांधकामे करून अतिक्रमणे केली जात आहेत. अशा
अतिक्रमणांवर महानगरपालिकेकडून कारवाया सुरू आहेत. काही
दिवसांपूर्वीच बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले पारिजात चौकातील
पत्र्याचे १६ गाळे महानगरपालिकेने जमीनदोस्त केले. त्यानंतर
बालिकाश्रम रस्त्यावरील महानगरपालिकेच्या जागेत असलेली
बांधकामे, गाळे हटवली. दोन दिवसांपूर्वीच मुकुंदनगर परिसरात
रस्त्याला अडथळा ठरणारी, तसेच महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत असलेली
अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर आता महानगरपालिकेने कोठला
परिसरात कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी राज चेंबरच्या साइड मार्जिनमध्ये बांधण्यात आलेली दुकाने,
हॉटेल्सची बांधकामे कारवाई करून हटवण्यात आली. या बांधकामांना दीड महिन्यांपूर्वी
महानगरपालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमणधारकांनी
कोर्टातून स्थगिती मिळवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सदर
बांधकामे विनापरवाना असल्याने न्यायालयाने स्थगिती दिली नाही.
त्यामुळे महानगरपालिकेने ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत.
महामार्गालगत असलेली व वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यावर असलेली
अतिक्रमणे हटवण्यात आल्याने नागरिकांकडून कारवाईचे स्वागत
करण्यात येत आहे.

प्रत्येक एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे

खासदार निलेश लंके; महिला सुरक्षा संदर्भात माळीवाडा व पुणे बसस्थानक परिसराची केली पाहणी

नगर – पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर एका युवतीवर एका नराधामाने बलात्कार केला. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला
लाजिरवाणी असून काळीमा फासणारी घटना आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही. एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव, गोरगरीब वर्ग लालपरीतून प्रवास करत असतो. मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून फॅन बसण्यासाठी बाकडे नाहीत,
कर्मचारी देखील सुरक्षित नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून याकडे सरकारला लक्ष
द्यायला वेळ नाही. माजी आरोग्यमंत्र्याचा मुलगा हरवला होता, त्याला एका तासात शोधून देण्याची तत्परता
सरकारने दाखवली. मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे अक्षरशा दुर्लक्ष असते. मी राज्य परिवहन
मंडळाकडे मागणी करणार आहे, की प्रत्येक एसटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व त्याचे कंट्रोल डेपोमध्ये ठेवा.
एसटीने प्रवास करणे देखील सुरक्षित राहिले नाही. माता, भगिनी व कॉलेजच्या मुलींची छेड-छाड होण्याचे प्रकार देखील
वाढले असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केले अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक व पुणे
बसस्थानकमधील सुरक्षिततेची पाहणी खासदार निलेश लंके यांनी केली. यावेळी त्यांनी वाहक चालक व प्रवाशांशी संवाद साधला. जिल्हा परिषदमधील एका विभागातील अधिकार्‍याने एका महिलेला रात्री ११ वाजेपर्यंत
जिल्हा परिषदमध्ये बसून ठेवण्याचा प्रताप केला. ही निषेधार्थ गोष्ट आहे त्या अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी मी
केली आहे. अधिकारी व सत्ताधारी यांच्यामध्ये असलेले संबंधामुळे असले प्रकार घडत आहे, असे मत खासदार
निलेश लंके यांनी व्यक्त केले.

शेंडी बायपास व वांजोळी येथील वस्तीवर दरोडे घालणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २ लाख ५८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

नगर – शेंडी बायपास येथील कसबे
वस्तीवर दरोडा टाकून लुटमार करणार्‍या
दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुयातील भोरवाडी येथे
पकडले आहे. त्यांच्याकडून २ लाख ५८ हजार रुपये
किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या कारवाईत
नेवासा तालुयातील वांजोळी येथील दरोड्याच्या गुन्ह्याची
ही उकल झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, २४ फेब्रुवारी रोजी
रात्री १ वाजण्याच्या सुमारास अशोक लहानु कजबे (रा.
कसबे वस्ती, शेंडी बायपास रोड) हे त्यांचे कुटूंबियासह
घरात झोपलेले असताना ६ ते ७ अज्ञात चोरट्यानी त्यांचे
घराचा दरवाजा तोडून, त्यांचे वडिलांना लाकडी दांडयाने
मारहाण करून, चाकुचा धाक दाखवून घरातील महिलांचे
दागिने जबरीने चोरून नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस
ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक
करत होते. या पथकास माहिती मिळाली की, हा गुन्हा तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले (रा.पिंपळगाव
कौडा, ता.नगर) याने त्याचे साथीदारासह केला असून तो सध्या त्याचा साथीदार विकी संजय काळे
(रा.भोरवाडी, ता.नगर) याचे घरी आहे. या माहिती नुसार पोलीस पथक भोरवाडी येथे विकी काळे याचे
घरी जात असताना पथकाची चाहुल लागताच तीन संशयीत इसम भोरवाडी येथील डोंगराच्या दिशेने
पळून जाऊ लागले.
पोलीस पथकावर आरोपींकडून दगडफेक पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला असता संशयीत इसमांनी पोलीस पथकावर दगडफेक
करण्याचा प्रयत्न केला. पथकाने तीन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी
तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले, (वय २७), सुशांत सुरेश भोसले (वय १९, दोघे रा. पिंपळगाव कौडा,
ता.नगर), विकी संजय काळे (वय १८, रा.भोरवाडी, ता.नगर) असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील
आरोपीकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपुस
केली असता त्यांनी हा गुन्हा साथीदार
अविनाश उर्फ खुडया सावत्या भोसले) रमेश
उर्फ रम्या सावत्या भोसले (दोघे रा.पिंपळगाव कौडा,
ता.नगर), अभिजीत किरण भोसले, तपेश किरण भोसले,
वैभव किरण भोसले (सर्व रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड)
अशांनी मिळून ४ दिवसापुर्वी शेंडी बायपास येथे रात्रीचे
वेळी केला असल्याचे सांगीतले.
बुर्‍हाणनगरच्या सराफाला विकले चोरीचे दागिने
पथकाने ताब्यातील इसमांना गुन्ह्यातील चोरी
केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता विकी
काळे यांने त्याचे ओळखीचा सोनार विनोद लक्ष्मण बुर्‍हाडे
(रा. बुर्‍हाणनगर, ता.नगर) यास विक्री केलेबाबत माहिती
सांगीतली. सोनार बुर्‍हाडे यांनी आरोपीकडून घेतलेले २
लाख ५८ हजार रूपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोने
हजर केल्याने ते जप्त करण्यात आले.
पथकाने आरोपीकडे आणखी इतर ठिकाणी गुन्हे
केले आहेत काय याबाबत विचारपूस करता तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले याने वांजोळी शिवार,
ता.नेवासा येथे रात्रीच्या वेळी एका वस्तीवर दरोडा टाकुन मारहाण करून चोरी केली असल्याची माहिती
सांगीतली. ताब्यातील आरोपीना एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार
धाकराव, अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, बापुसाहेब
फोलाणे, हृदय घोडके, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, राहुल सोळुंके, पंकज
व्यवहारे, सोमनाथ झांबरे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, अशोक लिपणे, विजय ठोंबरे, किशोर शिरसाठ,
बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, रविंद्र घुंगासे, जालींदर माने, आकाश काळे,
भाऊसाहेब काळे, रोहित येमुल, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, अमृत आढाव, मनोज लातुरकर,
सुनिल मालनकर, रमिजराजा आत्तार, भगवान थोरात, उमाकांत गावडे, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर
व महादेव लगड यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

उपनेते अजय बोरस्ते यांचे प्रतिपादन; शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियाना निमित्त अहिल्यानगर पदाधिकारी यांची नियोजनाची बैठक

नगर – एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षांमध्ये राज्यात विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या. जनतेच्या थेट
संपर्कात राहून मुख्यमंत्री काय असतो हे दाखवून दिले, त्यामुळे तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. विधानसभेची निवडणूक ही देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली असल्यामुळेच जनतेने मतदान केले व पुन्हा
राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. आपण राबवलेल्या योजना जनतेपर्यंत घेऊन जावे त्या माध्यमातून सदस्य
नोंदणी करत पक्षवाढीचे काम करावे. आता लोकसभा विधानसभेची निवडणूक संपली आहे. आता आपल्या निवडणुका
सुरू होणार आहे. यासाठी स्वतःसाठी सदस्य नोंदणी केली पाहिजे, गण-गट व प्रभागात जाऊन सदस्य नोंदणी करावी,
ज्याची सदस्य नोंदणी जास्त होईल त्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल, निवडणूक हे युद्ध
असते त्याची तयारी आत्ताच सुरू करा. आपली लढाई आता मित्रपक्षाबरोबर होऊ शकत. नेत्यांनी बाहेर पडावे शिवसैनिक
नेहमीच रस्त्यावर असतो. शिवसेना हा लोकांमधील पक्ष असून आता भगवी लाट आली असल्याचे प्रतिपादन शिवसेना
उपनेते अजय बोरस्ते यांनी केले. शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानानिमित्त अहिल्यानगर पदाधिकारी यांच्या नियोजनाच्या बैठकीत बोलताना अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख बाबू टायरवाले, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, महेश
लोंढे, आप्पा नळकांडे, सुरेश तिवारी, संग्राम कोतकर, दीपक खैरे, महिला जिल्हाप्रमुख मिरा शिंदे, शबनम इनामदार
आदींसह पदाधिकारी उपस्थित होते बाबु टायरवाले म्हणाले की अहिल्यानगर जिल्हा हा भगवामय
करायचा आहे. शिवसेनेला पूर्वीचे गतवैभव निर्माण करून देण्यासाठी पदाधिकार्‍यांनी जोमाने कामाला लागा. उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना  करायचे आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे यांचा आदर्श अंगीकारून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करायचे आहे. नगर शहरात २५ वर्ष
शिवसेनेचा आमदार होता, मात्र आता नाही. आता आपण सर्वांनी निष्ठावान म्हणून काम केले पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. पदे घेऊन नुसते बसू नका. पारनेर,
नगर, कोपरगाव, श्रीरामपूर येथील आपल्या हक्काचे आमदार गेले आहेत ते पुन्हा मिळवण्यासाठी काम
करू. भाजप बरोबर युती
नाही असे समजूनच तयारी
करा. निवडणूक झाल्यानंतर
पुन्हा पाहू. समाजातील छोटे
छोटे प्रश्न सोडवले तरी जनता
आपल्या पाठीमागे उभी राहत
असते असे ते म्हणाले.
अनिल शिंदे म्हणाले
की, राज्यात शिवसेना
पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला
असून तो फक्त एकनाथ शिंदे
यांच्या कामामुळेच वाढला
आहे. नगर शहरामध्ये २५
माजी नगरसेवक शिवसेनेत
आहेत. आता महापालिकेवर
देखील शिवसेनेचा भगवा
फडकवायचा आहे. सभासद
नोंदणी हा पक्ष वाढीसाठी महत्त्वाचा भाग
असून प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात सभासद
नोंदणी करावी. तालुकावाईज बैठका
घेऊन सदस्य नोंदणी केली जाणार
आहे. शहरात सुमारे ७० हजार सदस्य
नोंदणी केली जाणार असून जिल्ह्यात १
लाख सदस्य नोंदणी केली जाणार आहे.
पक्षातील पदाधिकार्‍यांमधील मतभेद
बाजूला ठेवून शिवसेना वाढीसाठी काम
करावे असे ते म्हणाले.
प्रास्ताविक शहरप्रमुख सचिन
जाधव यांनी केले.
यावेळी संभाजी कदम यांचे भाषण
झाले. माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे
यांनी आभार मानले.

मनोरंजन

‘आय लव यु’
बायको : तुम्ही आपल्या शेजारणीला ‘आय लव यु’ तर नाही ना म्हटलं?
नवरा : नाही तर, का? काय झालं?
बायको : ती कालपर्यंत मला ‘वहिनी’ म्हणत होती आज अचानक ‘ताई’ म्हणतेय!!

‘काही तरी खाऊन ये’
गणू : काकू सचिन आहे का घरी?
काकू : आहे ना, गरम गरम पोहे खातोय, तुला पण भूक लागली असे ना?
गणू : हो काकू : मग घरी जा, काही तरी खाऊन ये…

सुविचार-

असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.

वास्तू

घराच्या जिन्यासाठी पश्चिम, नैऋत्य,
मध्य दक्षिण, पश्चिम या दिशा शुभ आहेत.