हभप अमोल महाराज जाधव यांचे प्रतिपादन; फुलसौंदर मळा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
नगर – अहिल्यानगर ही संताची भुमी
आहे. ज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रात अग्रेसर
आहे. आपल्याला उज्वल संस्कृतीचा वारसा
आहे. विविधतेत एकता ही भारताची संस्कृती आहे.
भारतीय संस्कृती पाश्चिमत्य देशाप्रमाणे आधारलेली
नसून, त्यागावर आधारलेली आहे. त्यासाठी सर्वांनी
अध्यात्माचा प्रचार व प्रसार करावा, त्यातुनच
मनुष्याला शांती लाभणार आहे. मनुष्य जन्म हा आपला
व आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी मिळालेला
आहे. या जन्मात आपण सत्कर्म करुन भगवंतांचे
नामस्मरण केले पाहिजे, त्यातुनच आपणास मुक्ती
मिळेल, असे मौलीक विचार हभप अमोल महाराज
जाधव यांनी मांडले.
बुरुडगांव रोड येथील फुलसौंदर मळा येथे
अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत काल्याची हंडी हभप
अमोल महाराज जाधव यांच्या हस्ते फोडण्यात
आली. याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,
भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, नगरसेवक
गणेश कवडे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, सुरेश
तिवारी, राजेंद्र फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, एल.के.
आव्हाड, अनिल ठोकळ, कारभारी सुपेकर, इंजि.अनिल साळूंके,
सुधीर बाफना, संजय चाफे, पुरुषोत्तम चाफे, ऋषिकेश चाफे आदि
उपस्थित होते.
पुढे बोलतांना जाधव महाराज म्हणाले, आजच्या धावपळीच्या
जीवनात मनुष्य एवढा व्यस्त झाला आहे की, आपण कुठे
चाललो, काय करतो याचे भान राहिले नाही; त्यामुळे मनुष्यास
शांती मिळत नाही. मनुष्यास जर समाधान, शांती पाहिजे असेल
तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. गेल्या २६ वर्षांपासून भगवान
फुलसौंदर हे सप्ताहाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना हा
मोठा लाभ मिळवून देत आहे. त्यामुळेच सप्ताहातील किर्तने, प्रवचने
ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. राजकीय, सामाजिक
व धार्मिक क्षेत्रातील फुलसौंदर यांचे कार्य उत्तरोत्तर वाढव राहो, असे
ते म्हणाले.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, गेल्या २६ वर्षांपासून या
सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून, भाविकांचाही त्यास मोठा
प्रतिसाद मिळत असतो. परिसरातील नागरिकांना आध्यात्मिकेतेचा
लाभ व्हावा, यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार,
प्रवचनकारांची अमृतवाणीचे पर्वणी देत आहोत. त्याचबरोबर
मंडळाच्यावतीने सामाजिक उपक्रमही राबविले जात असतात. तसेच
वर्षभर मंडळाच्यावतीने वृक्षारोपण, गुणवंतांचा
सत्कार, योग शिबीरे अशा सामाजिक
उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
याप्रसंगी विष्णू फुलसौंदर म्हणाले, आज
मनुष्य शिकून कितीही मोठा झाला तरी त्याला अनेक
बाबतीत आध्यात्माचा आधार घ्यावा लागतो. प्रगती
करावी परंतु आपली संस्कृती, इतिहास हा जपला
पाहिजे. संत विचार हे आजही आपणास मार्गदर्शक
ठरत आहे. त्यासाठीच गेल्या २६ वर्षांपासून हा
ज्ञानयज्ञ सुरु असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,
अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात
आला. सप्ताह काळामध्ये संतसेवा केली. त्यांचा
सन्मान करण्यात आला. यावेळी उकृष्ट रांगोळी
काढल्याबद्दल आर्किटकट अपर्णा फुलसोंदर,
पोपट राऊत, राजेंद्र फुलसोंदर, संजय चाफे आणि
पुरुषोत्तम चाफे, दिंडे आदींचा सन्मान करण्यात
आला. काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ
अनेक भाविकांनी घेतला. सप्ताह यशस्वीतेसाठी
महाशिवरात्री उत्सव समिती व वैष्णव मित्र मंडळाच्या
कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी हभप विश्वनाथ राऊत, संभाजी कदम, सचिन जाधव,
सचिन शिंदे, दत्ता कावरे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, गजानन ससाने,
अशोकराव कानडे, पांडुरंग नन्नवरे, मधुकर शिंदे, बाळासाहेब जाधव,
कुंडलिक गदादे, अनिल इवले, प्रभाकर भांबरे आदींसह भाविक
उपस्थित होते. काल्याचे कीर्तनाचे महाप्रसादाचे संजय चाफे आणि
पुरुषोत्तम चाफे यांच्यावतीने करण्यात आले.
सूत्रसंचालन भास्करराव गायकवाड यांनी केले तर अवधूत
फुलसोंदर यांनी आभार मानले.





