स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २ लाख ५८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत
नगर – शेंडी बायपास येथील कसबे
वस्तीवर दरोडा टाकून लुटमार करणार्या
दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुयातील भोरवाडी येथे
पकडले आहे. त्यांच्याकडून २ लाख ५८ हजार रुपये
किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या कारवाईत
नेवासा तालुयातील वांजोळी येथील दरोड्याच्या गुन्ह्याची
ही उकल झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, २४ फेब्रुवारी रोजी
रात्री १ वाजण्याच्या सुमारास अशोक लहानु कजबे (रा.
कसबे वस्ती, शेंडी बायपास रोड) हे त्यांचे कुटूंबियासह
घरात झोपलेले असताना ६ ते ७ अज्ञात चोरट्यानी त्यांचे
घराचा दरवाजा तोडून, त्यांचे वडिलांना लाकडी दांडयाने
मारहाण करून, चाकुचा धाक दाखवून घरातील महिलांचे
दागिने जबरीने चोरून नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस
ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक
करत होते. या पथकास माहिती मिळाली की, हा गुन्हा तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले (रा.पिंपळगाव
कौडा, ता.नगर) याने त्याचे साथीदारासह केला असून तो सध्या त्याचा साथीदार विकी संजय काळे
(रा.भोरवाडी, ता.नगर) याचे घरी आहे. या माहिती नुसार पोलीस पथक भोरवाडी येथे विकी काळे याचे
घरी जात असताना पथकाची चाहुल लागताच तीन संशयीत इसम भोरवाडी येथील डोंगराच्या दिशेने
पळून जाऊ लागले.
पोलीस पथकावर आरोपींकडून दगडफेक पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला असता संशयीत इसमांनी पोलीस पथकावर दगडफेक
करण्याचा प्रयत्न केला. पथकाने तीन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी
तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले, (वय २७), सुशांत सुरेश भोसले (वय १९, दोघे रा. पिंपळगाव कौडा,
ता.नगर), विकी संजय काळे (वय १८, रा.भोरवाडी, ता.नगर) असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील
आरोपीकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपुस
केली असता त्यांनी हा गुन्हा साथीदार
अविनाश उर्फ खुडया सावत्या भोसले) रमेश
उर्फ रम्या सावत्या भोसले (दोघे रा.पिंपळगाव कौडा,
ता.नगर), अभिजीत किरण भोसले, तपेश किरण भोसले,
वैभव किरण भोसले (सर्व रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड)
अशांनी मिळून ४ दिवसापुर्वी शेंडी बायपास येथे रात्रीचे
वेळी केला असल्याचे सांगीतले.
बुर्हाणनगरच्या सराफाला विकले चोरीचे दागिने
पथकाने ताब्यातील इसमांना गुन्ह्यातील चोरी
केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता विकी
काळे यांने त्याचे ओळखीचा सोनार विनोद लक्ष्मण बुर्हाडे
(रा. बुर्हाणनगर, ता.नगर) यास विक्री केलेबाबत माहिती
सांगीतली. सोनार बुर्हाडे यांनी आरोपीकडून घेतलेले २
लाख ५८ हजार रूपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोने
हजर केल्याने ते जप्त करण्यात आले.
पथकाने आरोपीकडे आणखी इतर ठिकाणी गुन्हे
केले आहेत काय याबाबत विचारपूस करता तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले याने वांजोळी शिवार,
ता.नेवासा येथे रात्रीच्या वेळी एका वस्तीवर दरोडा टाकुन मारहाण करून चोरी केली असल्याची माहिती
सांगीतली. ताब्यातील आरोपीना एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार
धाकराव, अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, बापुसाहेब
फोलाणे, हृदय घोडके, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, राहुल सोळुंके, पंकज
व्यवहारे, सोमनाथ झांबरे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, अशोक लिपणे, विजय ठोंबरे, किशोर शिरसाठ,
बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, रविंद्र घुंगासे, जालींदर माने, आकाश काळे,
भाऊसाहेब काळे, रोहित येमुल, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, अमृत आढाव, मनोज लातुरकर,
सुनिल मालनकर, रमिजराजा आत्तार, भगवान थोरात, उमाकांत गावडे, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर
व महादेव लगड यांनी केली आहे.