उपनेते अजय बोरस्ते यांचे प्रतिपादन; शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियाना निमित्त अहिल्यानगर पदाधिकारी यांची नियोजनाची बैठक
नगर – एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षांमध्ये राज्यात विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवल्या. जनतेच्या थेट
संपर्कात राहून मुख्यमंत्री काय असतो हे दाखवून दिले, त्यामुळे तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. विधानसभेची निवडणूक ही देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली असल्यामुळेच जनतेने मतदान केले व पुन्हा
राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. आपण राबवलेल्या योजना जनतेपर्यंत घेऊन जावे त्या माध्यमातून सदस्य
नोंदणी करत पक्षवाढीचे काम करावे. आता लोकसभा विधानसभेची निवडणूक संपली आहे. आता आपल्या निवडणुका
सुरू होणार आहे. यासाठी स्वतःसाठी सदस्य नोंदणी केली पाहिजे, गण-गट व प्रभागात जाऊन सदस्य नोंदणी करावी,
ज्याची सदस्य नोंदणी जास्त होईल त्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला जाईल, निवडणूक हे युद्ध
असते त्याची तयारी आत्ताच सुरू करा. आपली लढाई आता मित्रपक्षाबरोबर होऊ शकत. नेत्यांनी बाहेर पडावे शिवसैनिक
नेहमीच रस्त्यावर असतो. शिवसेना हा लोकांमधील पक्ष असून आता भगवी लाट आली असल्याचे प्रतिपादन शिवसेना
उपनेते अजय बोरस्ते यांनी केले. शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानानिमित्त अहिल्यानगर पदाधिकारी यांच्या नियोजनाच्या बैठकीत बोलताना अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख बाबू टायरवाले, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, महेश
लोंढे, आप्पा नळकांडे, सुरेश तिवारी, संग्राम कोतकर, दीपक खैरे, महिला जिल्हाप्रमुख मिरा शिंदे, शबनम इनामदार
आदींसह पदाधिकारी उपस्थित होते बाबु टायरवाले म्हणाले की अहिल्यानगर जिल्हा हा भगवामय
करायचा आहे. शिवसेनेला पूर्वीचे गतवैभव निर्माण करून देण्यासाठी पदाधिकार्यांनी जोमाने कामाला लागा. उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे यांचा आदर्श अंगीकारून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करायचे आहे. नगर शहरात २५ वर्ष
शिवसेनेचा आमदार होता, मात्र आता नाही. आता आपण सर्वांनी निष्ठावान म्हणून काम केले पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. पदे घेऊन नुसते बसू नका. पारनेर,
नगर, कोपरगाव, श्रीरामपूर येथील आपल्या हक्काचे आमदार गेले आहेत ते पुन्हा मिळवण्यासाठी काम
करू. भाजप बरोबर युती
नाही असे समजूनच तयारी
करा. निवडणूक झाल्यानंतर
पुन्हा पाहू. समाजातील छोटे
छोटे प्रश्न सोडवले तरी जनता
आपल्या पाठीमागे उभी राहत
असते असे ते म्हणाले.
अनिल शिंदे म्हणाले
की, राज्यात शिवसेना
पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला
असून तो फक्त एकनाथ शिंदे
यांच्या कामामुळेच वाढला
आहे. नगर शहरामध्ये २५
माजी नगरसेवक शिवसेनेत
आहेत. आता महापालिकेवर
देखील शिवसेनेचा भगवा
फडकवायचा आहे. सभासद
नोंदणी हा पक्ष वाढीसाठी महत्त्वाचा भाग
असून प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात सभासद
नोंदणी करावी. तालुकावाईज बैठका
घेऊन सदस्य नोंदणी केली जाणार
आहे. शहरात सुमारे ७० हजार सदस्य
नोंदणी केली जाणार असून जिल्ह्यात १
लाख सदस्य नोंदणी केली जाणार आहे.
पक्षातील पदाधिकार्यांमधील मतभेद
बाजूला ठेवून शिवसेना वाढीसाठी काम
करावे असे ते म्हणाले.
प्रास्ताविक शहरप्रमुख सचिन
जाधव यांनी केले.
यावेळी संभाजी कदम यांचे भाषण
झाले. माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे
यांनी आभार मानले.