रवा नारळ लाडू

0
43

साहीत्य – 1/4 कप रवा, 1 कप साखर, 3/4 कप ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकनट, 2 टे स्पून तूप, 1 टे स्पून फ्रेश क्रीम, 1/2 कप दूध, 1/2 टी स्पून वेलची पावडर, थोडे ड्रायफ्रूट.

कृती – कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा चांगला गुलाबी रंगावर मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ घालून 5 मिनिटे भाजून घ्या. रवा छान खमंग भाजून झाला की त्यामध्ये साखर घालून दोन मिनिटे गरम करून फ्रेश क्रीम व थोडे दूध घालून मिक्स करून घ्या. मग राहिलेले दूध घालून मिक्स करून साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्या. साखर विरघळली की त्यामध्ये वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. विस्तव बंद करून मिश्रण कोमट झाले की त्याचे लाडू वळून घ्या.