शाही खिचडी

0
78

साहित्य – 3 वाट्या दिल्ली राईस, दीड वाटी मुगाची डाळ, 1 बटाट्याचे मध्यम काप, हिंग, हळद, 1 वाटी मटार दाणे, 2 कांदे, 2 इंच आलं, तूप, 15-20 लसूण पाकळ्या, मिरच्या, दही, थोडे काजू, बदाम, बेदाणे, जिरे, मीठ, गरम मसाला आणि सुक्या मिरच्या.

कृती – खिचडी करण्याच्या आधी 1 तास अगोदर डाळ व तांदूळ एकत्र करून धुवून ठेवावे. कांदे उभे पातळ चिरावे. पातेल्यात तूप तापवून काजू, बदाम, बेदाणे तळून घ्यावे. त्याच तुपात कांदा तळून घ्यावा. कांदा लालसर कुरकुरीत तळावा. आलं-लसणाची पेस्ट करावी. पातेल्यात तूप तापवून हिंग, जिरे, हळद, सुक्या मिरच्या आणि आलं-लसूण पेस्ट घालून हे सर्व जिन्नस परतावे. त्यात डाळ, तांदूळ, बटाटे, मटार दाणे टाकावेत. ते चांगले परतून तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे. चवीनुसार त्यात मीठ, गरम मसाला घालून मंद आचेवर खिचडी शिजू द्यावी. खिचडी वाढताना ती गरमागरमच वाढावी.