नगर – महावीर इंटरनॅशनल अहिल्यानगरच्या महिला विभागाच्या वतीने आनंदऋषीजी नेत्रालयातील रुग्णांच्या सोयीसाठी अद्यावत आरओ जलशुद्धीकरण मशीन देण्यात आले. महिला दिनानिमित्त झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात नेत्राल यातील महिला कर्मचार्यांचा सत्कारही करण्यात आला. ज्येष्ठ महिला श्रीमती सरला शेटिया, श्रीमती कलावतीबाई संचेती,
शकुंतला बाफ़ना व सुमनबाई कर्नावट यांच्या हस्ते मशीन देण्यात आले. यावेळी महिला विभागाच्या अध्यक्षा वैशाली शेटिया, सेक्रेटरी वर्षा बाफना, अर्पणा बोथरा, सुरेखा पारख, सुरेखा संचेती, सुनिता कर्नावट, अरुणा सुराना, उज्वला बोथरा, सजनबाई कटारिया, सरला बरमेचा आदींसह वीर व युवा विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. वैशाली शेटिया म्हणाल्या,
आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेने महावीर इंटरनॅशनल अहिल्यानगरमध्ये काम करत आहे. समाजाभिमुख
उपक्रमातून विविध संस्थांना मदत करत आहोत. माजी अध्यक्ष मनोज शेटिया यांनी आनंदऋषीजी नेत्रालय या मानवतेच्या मंदिरात आम्हाला सेवेची संधी देऊन जागतिक महिला दिनाच्या येथील महिला कर्मचार्यांना शुभेच्छा देता आल्याबद्दल सर्वांचे
आभार मानले. यावेळी नेत्र रूग्णालयाचे प्रमुख डॉ.आनंद छाजेड यांनी नेत्र रूग्णालयातील सेवांची माहिती दिली व नेत्र रूग्णालयाला आरओ प्युरिफायरचा होणारा फायदेशीर वापर सांगितला.