अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीत मोठी वाढ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आला ऐरणीवर

0
48

बंद पोलीस चौया कार्यान्वित करून गस्त वाढविण्याची पोलिस अधिक्षकांकडे मागणी

नगर – अहिल्यानगर शहर व परीसरामध्ये रोजच नवनवीन गुन्ह्याच्या घटना पाहता शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, शहरातील नागरीकांम ध्ये असुरक्षिततेची भावना आहे. रोजच चेन स्नॅचिंग, घरफोडी, टोळीयुध्द, लुटमार, दमदाटी असे गुन्हे घडत असल्याने पोलिस यंत्रणेकडून ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
शहरातील बंद असलेल्या पोलीस चौया पुन्हा कार्यान्वित करून गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या कडे करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष
इंजि. केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस अधिक्षक ओला यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, शहर परिसरात दररोज कुठे ना कुठे चेन स्नॅचिंग, चोर्‍या, घरफोड्या, रस्त्यात अडवून  टमार, ताबेमारी, धमकावणे, हाणामारी, घातक शस्रांनी प्राणघातक हल्ले अशा घटना वाढत आहेत. शहर परिसरात मोठ्या
प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याने त्यातून या गुन्हेगारांमध्ये टोळी युद्ध ही होत आहेत. रोजच नवनवीन गुन्ह्याच्या घटना पाहता शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, शहरातील नागरीकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण
झाली आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत असल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरलेले असून त्यांना घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेने अधिक दक्ष होत ही वाढती गुन्हेगारी मोडून काढण्याची गरज आहे.  या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शहर व परिसरात पोलिस गस्त वाढविण्यात यावी. तसेच बंद असलेल्या पोलीस चौया पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात याव्यात असे या निवेदनात म्हंटले आहे.
तसेच उपनगरी भागात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असल्याने तपोवन रोड वर नव्याने पोलीस चौकी उभारण्यात यावी, तसेच गुलमोहोर रोडवरील चौकी पुन्हा कार्यान्वित करावी. गुन्हेगारांना कडक शासन करावे व गुन्हेगारी संपुष्टात आणावी. जेणेकरुन नागरिकांमधील पोलीसांबद्दल विश्वास वाढेल. असेही या निवेदनात म्हंटले आहे.