नगर – आनंदधाम – राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म सा हे अद्वितीय महापुरुष १९ व्या शतकात होऊन गेले. सर्व भक्तांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान असलेले आचार्य भगवंत नेहमीच माता हुलसाच्या आठवणीने भावुक होऊन.
आई विषयी असलेले कृतज्ञतेचे भाव ते व्यक्त करत असत. ८ मार्च हा महिलांचा गोडवा गाणारा, नारी शक्ति ची महिमा
वर्णन करणारा दिवस| आनंदधाम येथे आनंद व्याख्यान माला अंतर्गत साध्वी श्री पुनीतदर्शनाजी म सा, यांनी सांगितले कि, आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगति करत आहे. स्त्री शक्ति ची अनुभूति ही राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, कल्पना चावला, किरण बेदी, मदर तेरेसा यांच्या रुपाने दुनिये समोर आहे. परंतु घर – परिवार – समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्त्रियांनी ४ बाजू सांभाळून घेणे आवश्यक आहे. बेअरिंग म्हणजे सहनशीलता वाढविली पाहिजे.
केअरिंग – घर – परिवारातील नात्यांची काळजी घेतली पाहिजे. शेअरिंग – आपल्या सद् भावना, सद् गुण सर्वांना वाटणे, म्हणजे शेअरिंग आहे. तर डेअरिंग करणे आवश्यक आहे कारण आपल्यात हिम्मत असेल तर आपली किम्मत वाढते. संस्कार दिवाकर श्री आलोकऋषिजी म सा नी आपल्या सुंदर मार्मिक प्रवचनातून नारी जाति करिता संदेश दिला. स्त्री फक्त अन्नदाता व जन्मदाता नसून जीवनदाता पण आहे. घर – समाजाच्या मर्यादेत राहून कार्य करणे, हा नारीचा आदर्श आहे. नारी शक्ति सेवा, स्नेह, समता, संस्कारांची सुंदर प्रतिमा आहे. माता हे स्त्री चे सर्वात उदात्त रुप आहे. फक्त फॅशनमध्ये, पार्ट्यांमधे महिलांनी आपला वेळ निरर्थक घालवू नये, तुलना करु नये व आपला आत्मविश्वास वाढवावा, या
तीन गोष्टी स्त्रियांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म सा, यांनी आपल्या उद् बोधनात सांगितले कि, दोन कुळांचा उध्दार करणारी नारी सर्वश्रेष्ठ आहे. तीर्थंकर भगवान सुध्दा स्त्री च्या कुक्षी मध्ये जन्म घेतात. महिलांनी आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. पूर्वी मुलाचा जन्म झाल्यावर आनंद
साजरा केला जात होता. तर मुलगी झाल्यावर दुःखी होत असत. परंतु आता बदल झाला आहे. मुलापेक्षा
मुलगी ही गुणवान मानली जाते. दीपक प्रमाणे ती दोन परिवारांचे नाव रोशन करते. महिला दिवसाचे औचित्य
साधून श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंन्स चतुर्थ झोन प्रांतीय महिला शाखेच्या वतीने वीरमातांचा सम्मान करण्यात आला. ज्या मातांनी आपल्या मुलींना किंवा मुलांना जिनशासन च्या सेवेत अर्पण केले आहे, त्यांच्या त्यागाचा
सपर्पणाचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म सा, यांचे लाडके शिष्य डॉ. श्री आलोकऋषिजी म सा यांना गुरु सेवेत अर्पण करणारी माता श्रीमती सुशिलाबाई अशोक बाफना तसेच श्री आराधनाजी म सांच्या आई श्रीमती कमलबाई बन्सीलाल मुनोत, श्री सुविज्ञाजी म सा व श्री भारवीजी म सा, या साध्वीजींच्या आई सौ. प्रतिभा नवनीत गांधी,
श्री श्रेयलश्रीजी म सा च्या आई सौ. त्रिवेणी संतोष बोरा यांचा सत्कार करण्यात आला. दररोज सकाळी ९ ते १० पर्यंत होत असलेल्या सुंदर मार्मिक प्रवचनांचा लाभ श्रावक – श्राविकांनी घ्यावा, असे श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन स्था. धार्मिक परीक्षा बोर्डच्यावतीने करण्यात आले आहे.