विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणार्‍या महिलांचा यशस्विनी पुरस्काराने सन्मान

0
18

ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन ट्रस्टचा उपक्रम

नगर – विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटावनार्‍या महिलांना यशस्वीनी पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगरच्या ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन ट्रस्ट व कमला
आयुर्वेद हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानेच्या या कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले. शहरात ब्राम्हण समाजातील
अनेक महिलांनी स्वबळावर उद्योग व व्यवसायासह विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. अशा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, न्यायव्यवस्था, राजकीय क्षेत्रातील २० महिलांचा विविध क्षेत्रातील यशस्वी व ज्येष्ठ महिलांच्या हस्ते यशस्विनी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय आयुर्वेद आणि जीवनशैलीवर या विषयावर डॉ. अंशू मुळे यांचे व्याख्यानही झाले.
या सन्मान सोहळ्यात राष्ट्रीय खेळाडू कु. गार्गी मोहोळे, बाल कीर्तनकार कु.रेणुका निसळ, जया देशपांडे, स्वाती देशमुख, डॉ.प्रीती भोंबे, डॉ. रेणुका जोशी, मोहिनी कुलकर्णी, अ‍ॅड.बागेश्री जरंडीकर, प्रांजली जागीरदार, वर्षा जोशी, सुचिता देवचके, भूपाली निसळ, अपर्णा बालटे, स्वाती रानडे, प्रिया जानवे, अ‍ॅड. प्रज्ञा हेंद्रे जोशी, रेणुका करंदीकर, केतकी जोगदे, जुई मुळे व धनश्री कुलकर्णी आदी महिलांना यशस्वीनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख
पाहुण्या डॉ.विद्या जोशी, उषा देशमुख, मानसी मुळे, प्रा. सविता काळे, प्रियेशा कुलकर्णी, स्नेहा रानडे, पद्मजा धोपावकर, धनश्री खरवंडीकर, अश्विनी भालेराव, डॉ. अंशू मुळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात डॉ.अंशू मुळे यांनी आयुर्वेदातील
आदर्श जीवनशैली बाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सध्याच्या सोशल मिडीया, फास्टफूडच्या काळात व्यायामाचा अभाव वाढत आहे. जठराग्नी मंदावला जात असल्याने मोठ्याप्रमाणात आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अकाली मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. हे टाळण्यासाठी दररोज सर्वांनी स्वतःच्या शरीरासाठी व मनासाठी थोडावेळ द्यावाच. आपल्या
पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेद शास्त्राचा शोध लावला आहे. आयुर्वेदात सांगितलेली आदर्शवत जीवनशैली
आपण सोडून परकीयांचे अनुकरण करत आहोत. हे अनुकरण आपल्यासाठी धोकादायक आहे, असे सांगून आदर्श जीवनशैली बाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक धनश्री कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अपूर्वा काळे व शिल्पा सोमणी यांनी केले. आभार आसावरी नातू यांनी मानले. यावेळी ट्रस्टचे चिन्मय सुखटणकर, डॉ. महेश मुळे, ऋषिकेश धर्माधिकारी, अनिरुद्ध देवचक्के, संदीप भापकर, धनश्री कुलकर्णी, हेमंत लोहगावकर, निखिल कुलकर्णी, अमित काळे, रमा मोडक, दीप्ती चांदेकर कोअर कमिटी सदस्य मिलिंद कुलकर्णी, शैलेश राजगुरू, उमेश भालेराव, श्रीपाद पुणतांबेकर व अमित परंडकर आदी उपस्थित होत