पहिला चष्मा कुठं वापरला गेला?

0
82


जगरहाटी आमूलाग्र बदलून टाकणारा शोध कोणता असा प्रश्न विचारला गेला, तर आपल्याला अग्नि, चाक, मुद्रणयंत्र आणि अर्थातच पर्सनल कॉम्प्युटर किंवा सेलफोन यांची आठवण होईल. ती तशी चुकीचीही असणार नाही. पण
अतिपरिचयादवज्ञा म्हणतात त्याची प्रचिती म्हणूनच की काय आपल्याला साध्यासुध्या चष्म्यांची आठवण
येणार नाही. पण विचार करा चष्म्याचा शोध लागला नसता तर किती जणांची आयुष्यं उद्ध्वस्त
झाली असती. मोटार किंवा असंच दुसरं कोणतंही वाहतुकीचं साधन चालवणं तर सोडाच पण
साधं रस्त्यावरून चालणंही मुश्कील झालं असतं. कशाचंही वाचन करणं अशय होऊन बसलं असतं
आणि ते सर्व सोडून नुसता टीव्ही बघायला म्हटलं तरी तेही साध्य झालं नसतं. तरीही या अतिशय
उपयुक्त साधनाचा शोध कुठं आणि कधी लागला, याविषयी छातीठोकपणे काहीही सांगता येणे शय
नाही. तसा काचेचा शोध चार हजार वर्षांपूर्वीच लागला होता. पण त्या काचेपासून घासून घासून
भिंग बनवता येतात याचा पत्ता मानवाला लागला नव्हता. तो लागला तेव्हाही त्यातून वस्तूची प्रतिमा
वृद्धिंगत करणार्‍या मॅग्निफाइंग ग्लास तयार केल्या गेल्या. त्यांनाच मग वेगवेगळ्या मखरांमध्ये बसवून
त्याच्यापासून हातात धरून वस्तू पाहण्यासाठीची साधनं बनवली गेली. पण त्यांना चष्मा म्हणता
येणार नाही. कारण एक तर ते साधन हातात धरून एखादी वस्तू न्याहाळता येत असे. पण ते सतत
डोळ्यांसमोर धरून वाटेवरून चालणं किंवा वाचन करणं शय नव्हतं.
पुढं क्वाटर्झ या निसर्गात मिळणार्‍या पदार्थापासून भिंग तयार करता येतात याचा शोध
लागल्यावर चष्मा बनवायला सुरुवात झाली. असे पहिले इटलीमध्ये १२६८ ते १२८९ या काळात
तयार केल्याचा पुरावा मिळाला आहे. डॉमिनिकन धर्मगुरू जोर्दानो द पिस्का याने २३ फेब्रुवारी १३०६
या दिवशी दिलेल्या प्रवचनामध्ये आपली दृष्टी सुधारणार्‍या या चष्म्याचा वापर सुरू होऊन वीस
वर्षही उलटली नाहीत, असं स्पष्टपणे म्हटलं होतं. ही भिंगं जनावरांची हाडं, कातडी किंवा धातू यापासून
तयार केलेल्या फ्रेममध्ये बसवली जात. अशा प्रकारचे चष्मे अर्थात नाकावर एका घट्ट बसणार्‍या
चापानं बसवले जात. हे सोईचं नव्हतं आणि काही वेळ गेल्यानंतर नाकाचा तो भाग दुखायला लागे.
पण त्या फ्रेमला काड्या जोडून त्या कानांवर ठेवल्या तर चष्मा कोणतीही वेदना न जाणवता दीर्घ काळ
वापरता येऊ शकतो, याचा शोध लागायला आणखी चारशे वर्षं लोटावी लागली. आज वापरले जातात
तशा प्रकारचे चष्मेही युरोपातच, इटली व फ्रान्स इथं प्रथम तयार केले गेले.
यापुढचं महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं ते अमेरिकेत. तिथं बेन्जामिन फ्रॅन्कलिन याला
दूरवरचं पाहण्यासाठी आणि वाचण्यासाठी अशा दोन चष्म्यांचा वापर करावा लागत असे. वारंवार त्यांची
अदलाबदल करायला तो कंटाळला. तेव्हा त्यानं त्या दोन्ही चष्म्यांच्या काचा अर्ध्यावर कापून एकमेकींना
जोडून टाकल्या. अशा रीतीनं पहिला बायफोकल चष्मा अस्तित्त्वात आला