मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
37


वाळूची दलदल हा काय प्रकार आहे? दलदल म्हटली की पाणी आले. दलदलीत
रुतलेला माणूस किंवा प्राणी जसजसा या चिखलातून बाहेर यायचा प्रयत्न करतो, तसतसा
तो अधिकाधिक खोल रुतत जातो हा आपला अनुभव. नेहमीच्या दलदलीत खाली चिकण
मातीचा थर आणि वरती वाळूचा मोठा थर असतो. ही दलदल नदीचा काठ किंवा समुद्र किनारा
यांच्याजवळ असते.
या वाळूत पुराच्या वेळेस किंवा भरतीच्या वेळेस पाणी भरले जाते, पण चिकण मातीतून हे
पाणी मुरू शकत नाही. यामुळे ते वाळूतच साठून राहते व हळूहळू दलदल तयार होते.
या दलदलीत फसल्यावर खूप जलद हालचाल किंवा घाबरून धडपड केली की, बुडत्याचा पाय
खोलात अशी परिस्थिती निर्माण होते. अशा तर्‍हेने दलदलीत माणसापासून हत्तीपर्यंत कुठल्याही
आकार-प्रकाराचा प्राणी सापडून बुडतो. वाळवंटात वार्‍यानं वाळू चाळली जाऊन वाळूचे थर बनतात.
यातच तापमानाचा फरक निर्माण होऊन वाळूचे वरून खाली व खालून वर असे चक्रीप्रवाह सुरू
होतात. अशा वाळूच्या थरांना वाळूची दलदल म्हणतात. मात्र यात पाणी नसते. अशा वाळूप्रवाहात
सापडलेल्या माणसाला किंवा वाहनाला वाचवणे अवघडच असते