चेहर्‍यावरील सुरकुत्या

0
86

* कुस्करलेला बटाटा रेशमी कापडात
बांधून रोज थोडा वेळ डोळ्यांवर ठेवल्यास
डोळ्यांखालील काळवंडलेपणा नाहीसा होतो.
लिंबाचा रस गाळलेला, दोन तोळे गुलाब अर्क,
२ तोळे ग्लिसरीन मिसळून बाटलीत भरून
ठेवावं. रात्री झोपताना चेहर्‍यावर चोळून लावावे.
वीस दिवस उपचार केल्याने मुरूम, पुटकुळ्या
दूर होऊन त्वचा मऊ आणि तजेलदार होते.
चेहर्‍यावर ग्लो येतो.
* नारळाचे तेल नैसर्गिक प्रकारे सनटैन
दूर करतो. उन्हात बाहेर निघण्यापूर्वी २०-२५
मिनिटे पहिले चेहरा, हात-पायावर लावावे.
* पपई-चेहर्‍यावर सुरकुत्या दिसत
असतील तर पपईचा गर काढून चेहर्‍यावर
लावा. हळूहळू सुरकुत्या नाहीशा होतील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.