वास्तू

0

* वास्तूनुसार स्वस्तिक लावणे
शुभलक्षणी समजले जाते.
* घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक
किंवा पिरॅमिड लावावे.

पनीर-बटाटा भाजी

0

पनीर-बटाटा भाजी

साहित्य – बटाटे, पनीर, गरम मसाला, टोमॅटो, मलई, थोडेसे दही, जिरे, धने, सैंधव मीठ व तूप.

कृती – बटाटे सोलून त्याच्या छोट्या फोडी करून घ्या. पनीरचे तुकडे करून घ्या. पनीर व बटाटे तळून काढा. त्यानंतर
कुकरमध्ये जिरे, धने, गरम मसाला टाकून त्यात टोमॅटो टाका व पाणी ओतून उकळू द्या. उकळत्या पाण्यात पनीर व बटाटे टाका. नंतर एक चमचा दही व दोन चमचे मलई व मीठ टाकून खाली उतरवा. गरजेप्रमाणे मिठ टाका. चांगली चव लागते.

आरोग्य

0

काविळ बरी होण्यासाठी


* शेवगा पोटाशी निगडित आजारांपासून बचाव करते. शेवगा आणि नारळ पाण्याचे एकत्र
सेवन केल्याने जुलाब आणि कावीळ हे आजार बरे होतात.
* शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर मात्रेत असते. ज्याने हाड मजबूत
होतात. एवढंच नव्हे तर रक्त देखील साफ होत

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

घोडा आणि म्हातारा 

एका गावात एक म्हातारा आपल्या मुलांसोबत राहात होता. त्यांनी एक घोडाही पाळला होता. पुढे काही दिवसांनी घोडा विकून टाकावा, असे वाटल्याने म्हातारा व त्याचा मुलगा घोडा विकण्यासाठी बाजाराच्या रस्त्याने चालले होते. काही अंतर गेल्यानंतर वाटेत त्यांना एक माणूस भेटला आणि म्हणाला, “आजोबा, अहो, त्या मुलाला पायीच कशाला चालायला लावता? त्यापेक्षा त्याला घोड्यावर बसवा आणि तुम्ही लगाम धरून चालत जा.’ असे म्हणताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावर बसवले आणि स्वतः लगाम धरून पुढे चालू लागला. असे काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा त्यांना एक माणूस आडवा आला आणि घोड्यावर बसलेल्या मुलाला म्हणाला, “अरे आळशा, मूर्खासारखा स्वतः घोड्यावर बसलास आणि आपल्या म्हातार्‍या बापाला खुशाल चालायला लावतोस.

तुला काही शरम तरी आहे की नाही?” असे ऐकताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावरून खाली उतरवले आणि स्वतः घोड्यावर बसला आणि मुलगा लगान धरून पुढे चालू लागला. अशा प्रकारे काही अंतर जाताच वाटेतील दोन स्त्रियांचे लक्ष त्यांच्याकडे जाताच त्या बोट दाखवीत म्हणाल्या, “बिचारा मुलगा पायी चालला आहे आणि बाप बघा कसा आरामात बसून प्रवास करीत आहे! याला काही मुलाविषयी प्रेम दिसत नाही.” तसा त्या स्त्रियांचा संवाद ऐकताच म्हातार्‍याने आपल्या पाठीमागे मुलाला बसविले आणि वाट चालू लागला. काही अंतर जात नाही, तोच परत एक माणूस आडवा येत म्हणाला, “बाबा, घोडा तुमचाच आहे ना?” “हो तर, हा आमचाच आहे”. असे म्हातारा उत्तरला असता तो माणूस म्हणाला, “मला काही हे खरे वाटत नाही. हा जर तुमचाच घोडा असता, तर तुम्ही बिचार्‍याचे असे हाल केले नसते.

खुशाल दोघे आरामात त्याच्यावर बसलात. बिचारा ओझ्याने अगदी थकून गेलेला दिसतो. आता तुम्ही दोघे त्याला उचलून घ्या आणि चालू लागा.” असा सल्ला मिळताच दोघे बापलेक घोड्यावरून खाली उतरले. मग त्यांनी घोड्याला जमिनीवर आडवे पाडून त्याचे पाय दोरीने बांधून त्यात एक जाडजूड वेळू अडकवला आणि ते घोड्याचे धूड खांद्यावर घेऊन ते पुढे चालू लागले असता हे अजब दृश्य पाहून सर्व लोक त्यांच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागले. काही लोक टाळ्या वाजवू लागले. हा कोलाहल ऐकून घोडा बिथरला. त्याने पायांना हिसके देत दोर तोडला. पायाचे दोर तुटताच घोडा खाली वाहत असलेल्या नदीत पडला आणि बुडून मेला.

तात्पर्य : एखादे काम करीत असता जो तो वेगवेगळ्या सूचना देत असतो. त्यावेळी योग्य- अयोग्य हे आपल्या मनाशी ठरवून वर्तन करावे.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

हेलियम वायूचा उपयोग काय?

हेलियम याचा अर्थ सूर्यावरचा. हेलिऑस म्हणजे सूर्य. प्रथम हेलियम सूर्यावर असल्याचा शोध लागल्यामुळे या वायूला हेलियम हे नाव पडले. हेलियम हा निष्क्रीय वायू आहे. तो चवरहित, गंधय्रंग-विहीन आहे. हायड्रोजन खालोखाल हलका असलेला वायू एका बाबतीत तरी हायड्रोजनच्या विरुद्ध गुणधर्माचा आहे. म्हणजे तो हायड्रोजनसारखा ज्वलनशील नाही. किंबहुना तो जळतच नाही. सूर्याचा वर्णपट बघत असताना इ. स. १८६८ मध्ये सर जोझेफ नॉर्मन लॉकीयर व पियेर जान्सेन या दोन शास्त्रज्ञांना स्वतंत्रपणे या वायूचं अस्तित्व जाणवलं. यानंतर पृथ्वीवर हा वायू अत्यल्प प्रमाणात असल्याचं शोधून काढण्यात आलं. हा वायू हलका आहे, पण ज्वलनशील नाही. या गुणधर्माचा फायदा घेऊन निरनिराळ्या आकार-प्रकाराची बलुन्स पाठविण्यासाठी या वायूचा उपयोग होतो. पाणबुडे सागरातून खूप खोलवरून सागरपृष्ठाकडे येत असताना त्यांना ऑसिजन व हेलियमचे मिश्रण देण्यात येते, तर दमेकर्‍यांना त्रास कमी व्हावा म्हणून हेलियम वायू हुंगवला जातो.
याशिवाय अ‍ॅल्युमिनियमचे वेल्डिंग करणे, लेझर निर्मिती आदी प्रक्रियांतून हेलियमचा वापर होतो. याशिवाय अतिशीत तापमानाच्या प्रयोगातही हेलियम वापरला जातो.

 

सुविचार

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

दैनिक पंचांग बुधवार, दि. १३ डिसेंबर २०२३

देवदीपावली, मार्तंड भैरव, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, ज्येष्ठा
११|०५ सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल.

वृषभ : व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आजचा दिवस महत्वपूर्ण ठरेल.

मिथुन : आर्थिक बाबतीत एखादी विषम परिस्थती उद्भवण्याआधी आपली आर्थिक स्थिती तपासून स्थिती पाहावी लागेल.

कर्क : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्याल.

सिंह : जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्याल. दिवस आनंदात जाईल. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल.

कन्या : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल.

तूळ : आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शयता. आज जास्त खर्च होईल. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवतील.

वृश्चिक : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात.

धनु : रहाते घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. प्रवासाचे योग संभवतात.

मकर : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो.

कुंभ : घरगुती बाबतीत अधीरता टाळा. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल.

मीन : सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

फुले म्हणजे पृथ्वीवर सुगंधाची उधळण करणारे व हृदयाला प्रकाशित करणारे तारे आहेत.

आरोग्य

हाडांच्या मजबुतीसाठी मटार

बध्दकोष्ठतेच्या त्रासावरही मटार फायदेशीर आहे, कारण मटारमध्ये फायबरची मात्रा
अधिक असते. मटारमध्ये प्रथिन्यांबरोबरच ‘क’ जीवनसत्त्वही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे
हाडांच्या मजबुतीसाठी मटार उपयुक्त ठरतो.

खव्याच्या मिठाईची आईस्क्रीम

0

खव्याच्या मिठाईची आईस्क्रीम

साहित्य : खव्याची मिठाई अर्धा
किलो, दूध एक लिटर, साखर चवीनुसार, २
वेलदोड्यांची पूड.
कृति : दूध तापवत ठेवा. ते जेव्हा
कोमटसर तापेल तेव्हा त्यातून एक वाटी
दूध काढून घ्या. काढलेल्या दुधात मिठाई व
वेलची पूड मिसळून मिसरमध्ये व्यवस्थित
फेटून घ्या. हे मिश्रण उरलेल्या दुधात टाकून
एक उकळी द्या.
नंतर त्यात साखर मिसळून ती
विरघळू द्या. थंड झाल्यानंतर साच्यात ओतून
फ्रिजरमध्ये गोठण्यासाठी ठेवा. व्यवस्थित
गोठल्यानंतर बाहेर काढा. स्वादिष्ट आईस्क्रीम
तयार असेल.