सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

 

आरोग्य

0

फिटनेससाठी टाळा हे पदार्थ

फिटनेससाठी तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ आहारातून कमी करा. यामुळे फॅट तर
वाढतातच शिवाय अनेक आजारांनाही आमंत्रण मिळते. जास्त मीठ असणारे पदार्थ म्हणजे सॉस,
केचअप, चिप्स, पापड टाळा.

तोंडोली मटार मसालेभात

0

तोंडोली मटार मसालेभात

साहित्य : २ वाट्या तांदूळ, २ वाट्या
उभी चिरलेली तोंडली, १ वाटी मटारचे दाणे,
२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १ चमचा काळा
मसाला, १ चमचा धणेपूड, १/२ चमचा
जिरेपूड, १/२ चमचा लमवंग, दालचिनी पूड,
तेल, तिखट, मीठ, हळद, दही, ओले खोबरे,
कोथींबीर.
कृती : तांदूळ स्वच्छ धूवून ठेवावे.
तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा.
त्यात तोंडली व मटारचे दाणे घालून परता.
थोडे पाणी घालून ४ वाफा काढा. नंतर त्यात
तांदूळ घालून परता. तिखट, मीठ, मसाले,
हळद, दही, ओले खोबरे, कोथींबीर, मिरच्यांचे
तुकडे घालून ढवळा. तांदळाच्या दुप्पट पाणी
घालून भात करा. जरूर वाटल्यास आणखी
थोडे पाणी घाला. चांगली वाफ आणा.

टक्कल पडत असल्यास

तजेलदार त्वचेसाठी

* रोज झोपण्यापूर्वी व सकाळी
आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला बदामाच्या तेलाने
मालिश करावे. यामुळे कोरडी त्वचा तजेलदार
बनते.
* एरंडीचे तेलसुद्धा खूप फायदेशीर
आहे. दोन महिने रोज रात्री या तेलाने केसांना
मॉलिश केल्यास टक्कल पडत नाही.

सल्ला

0

मनावरच्या ताण दूर करण्यासाठी दीर्घ
श्वास घ्या. हळूहळू श्वास आत घेण्याचा
प्रयत्न करा. श्वास आत घेण्याचा कालावधी
हळूहळू आपोआपच वाढत जाईल.

वास्तू

0

दुकानाचे प्रवेशद्वार पूर्वेस किंवा उत्तरेस
असावे.
संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. १४ डिसेंबर २०२३

शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, मूळ ०९|४७                                                           सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.


राशिभविष्य
मेष : आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न  आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. वरिष्ठ
अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने
शब्द वाढवू नका.

वृषभ : कला क्षेत्रात यश मिळण्याची शयता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची
शयता आहे. मानसन्मानात वाढ होईल. गुंतवणूक विचारपूर्वक करा.

मिथुन : एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीती भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. धार्मिक
कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा
सहयोग मिळेल.

कर्क : आज आपणास कठोर श्रम करावे लागतील. काही निष्कारण चिंतांमुळे आपली
व्यग्रता वाढेल. विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आहारावर
विशेष लक्ष द्या.

सिंह : आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. मित्रांमध्ये होणारे
वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मित्रांबरोबर वेळ जाईल.

कन्या : मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न
वातावरण राहील. आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल.

तूळ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. आरोग्याची काळजी
घ्या. व्यस्त राहाल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आय-व्ययमध्ये संतुलन राहील.

वृश्चिक : इतर लोकांना आपल्या स्वतः च्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही
उत्तम वेळ आहे. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा.

धनु : कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र
राहील. आळस करू नये, कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा.

मकर : आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी
आपल्यासाठी फलदायी ठरेल. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग.

कुंभ : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध
वाढविण्याचा प्रयत्न करा.

मीन : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या
व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मनावरील दडपण दूर.

                                                               संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

0

विमान प्रवास सुरू करण्यापूर्वी त्याने स्वतःचा विमा उतरवला.
आणि तो बायकोच्या नावे पोस्टात टाकला.
नंतर सहजच शेजारी असलेल्या वजन काट्यावर तो चढला.
वजनाबरोबरच त्याचे भविष्य छापलेले तिकीट त्याला मिळाले.
तिकिटावर लिहिले होते,
‘तुम्ही नुकतीच जी गुंतवणूक केली आहे तिचा तुमच्या जवळच्या लोकांना
चांगलाच फायदा होईल.’

मानेवरील डाग दूर होण्यासाठी

मानेवरील डाग दूर होण्यासाठी

* काकडीची पेस्ट बनवून घ्यावी. त्यात थोडं दही मिसळून मानेवर लावल्याने डाग दूर होतात.
* एका लिंबाचा रस व दोन चमचे आवळ्याचा कीस लोखंडी कढईत रात्री भिजत घालावे. केसांना लावावे.               धुतल्यावर काळे होतात.
संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0

* डोळ्यांची आग थांबण्यासाठी काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवाव्यात.
* फ्लॉवर वाळवायचा असेल, तर त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात
वाळवावीत.