मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
124

हेलियम वायूचा उपयोग काय?

हेलियम याचा अर्थ सूर्यावरचा. हेलिऑस म्हणजे सूर्य. प्रथम हेलियम सूर्यावर असल्याचा शोध लागल्यामुळे या वायूला हेलियम हे नाव पडले. हेलियम हा निष्क्रीय वायू आहे. तो चवरहित, गंधय्रंग-विहीन आहे. हायड्रोजन खालोखाल हलका असलेला वायू एका बाबतीत तरी हायड्रोजनच्या विरुद्ध गुणधर्माचा आहे. म्हणजे तो हायड्रोजनसारखा ज्वलनशील नाही. किंबहुना तो जळतच नाही. सूर्याचा वर्णपट बघत असताना इ. स. १८६८ मध्ये सर जोझेफ नॉर्मन लॉकीयर व पियेर जान्सेन या दोन शास्त्रज्ञांना स्वतंत्रपणे या वायूचं अस्तित्व जाणवलं. यानंतर पृथ्वीवर हा वायू अत्यल्प प्रमाणात असल्याचं शोधून काढण्यात आलं. हा वायू हलका आहे, पण ज्वलनशील नाही. या गुणधर्माचा फायदा घेऊन निरनिराळ्या आकार-प्रकाराची बलुन्स पाठविण्यासाठी या वायूचा उपयोग होतो. पाणबुडे सागरातून खूप खोलवरून सागरपृष्ठाकडे येत असताना त्यांना ऑसिजन व हेलियमचे मिश्रण देण्यात येते, तर दमेकर्‍यांना त्रास कमी व्हावा म्हणून हेलियम वायू हुंगवला जातो.
याशिवाय अ‍ॅल्युमिनियमचे वेल्डिंग करणे, लेझर निर्मिती आदी प्रक्रियांतून हेलियमचा वापर होतो. याशिवाय अतिशीत तापमानाच्या प्रयोगातही हेलियम वापरला जातो.