अक्रोडच्या साली जाळून त्याची राख
बनवा. या राखेने मंजन केल्यास दात मजबूत,
स्वच्छ आणि चमकदार बनतात
दैनिक पंचांग शनिवार, दि. १६ डिसेंबर २०२३
विनायक चतुर्थी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, श्रवण २८|३७
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य
मेष : व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे.
वृषभ : आपला एखादा मित्र आपल्या विचारांबद्दल महत्वपूर्ण सल्ला देऊ शकतो. वाहने व उपकरणांपासून धोका संभवतो.
मिथुन : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. मागील उधारी वसुल होईल.
कर्क : आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या.
सिंह : आज रात्री विश्रांती घ्या. रहाते घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
कन्या : राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल.
तूळ : घरगुती बाबतीत अधीरता टाळा. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. मागील केलेले प्रयत्न आज फलद्रूप होतींल.
वृश्चिक : ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा.
धनु : निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा.
मकर : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल.
कुंभ : अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या.
मीन : पत्नी व मुले यांच्या सहवासामुळे मानसिक शांतता लाभेल. आपले इप्सित साध्य होण्याचे योग येतील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
फ्लॉवर-सुकामेवा कटलेट
फ्लॉवर-सुकामेवा कटलेट
साहित्य : एक कप फ्लॉवरचा कीस,
१०० ग्रॅम खवा, तेल, एक कप पनीरचा
कीस, एक कप भरड वाटलेला सुकामेवा
(काजू, बदाम, चारोळी, पिस्ता, अक्रोड इ.),
लिंबू, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,
हळद, मिरची पूड, गरम मसाला, दोन बटाटे
(उकडून), एक चमचा मैदा, ब्रेडचा चुरा,
मीठ, मोहरी, जिरे.
कृती : कढईत तेल तापवून मोहरी जिरे
तडतडवा. त्यात हळद, कांदा, हिरवी मिरची,
कोथिंबीर टाकून परता. बटाटे कुस्करून
घ्या. नंतर फ्लॉवर, पनीर, बटाटे व सुकामेवा
टाकून परता, खवा भाजून मिसळा. मिश्रणात
दही मिसळून व्यवस्थित परतून घ्या. मिश्रण
थाळीत पसरून गोल तुकड्यांत कापून घ्या.
मैद्याचे साधारण दाट पीठ बनवून त्यात कटलेट
बुडवून ब्रेडच्या चुर्यात घोळवून तेलात मध्यम
जाळावर तळून घ्या. सर्व्ह करताना थोडेसे
काळे मीठ टाकून टोमॅटो सॉससोबत स्वादिष्ट
फ्लॉवर सुकामेवा कटलेटचा आस्वाद घ्या.
रुक्ष चेहर्यासाठी
रुक्ष चेहर्यासाठी
* चेहरा रुक्ष असेल तर २ चमचे ताजी
मोहरी वाटून त्यात १ चमचा दूध व चिमूटभर
हळद मिसळून पेस्ट बनवून लावा व १०
मिनिटांनंतर चेहरा धुवा.
* संत्र्याची साले १०० ग्रॅम घेऊन
वाळवून वाटून पूर्ण करावे. यात १०० ग्रॅम
बाजरीचे पीठ आणि १२ ग्रॅम हळद मिसळून
पाण्यात भिजवून चेहर्यावर लावावं. नंतर
स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १५ डिसेंबर २०२३
—, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, पु.षा.०८|११ उ.षा.३०|२५
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.
राशिभविष्य
मेष : कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील.
वृषभ :व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काही काळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस.
कर्क : मान-सन्मानात वाढ होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल.
सिंह : न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे.
कन्या : आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आपल्या करीयरमधील ध्येयपूर्ती कराल.
तूळ : आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करेल.
वृश्चिक : आपल्या क्रोधावर संयम ठेवाल आणि सहकार्यांबरोबर वादाची स्थिती टाळाल. आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. मागील उधारी वसुल होईल.
धनु : अधिकार्यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
मकर : शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा. दिवस संमिश्र जाईल.
कुंभ : आर्थिक नुकसानीची शयता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.
मीन : धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. व्यापार्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.






