दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १५ डिसेंबर २०२३

0
76

—, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, पु.षा.०८|११ उ.षा.३०|२५
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील.

वृषभ :व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काही काळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस.

कर्क : मान-सन्मानात वाढ होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल.

सिंह : न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे.

कन्या : आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आपल्या करीयरमधील ध्येयपूर्ती कराल.

तूळ : आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करेल.

वृश्चिक : आपल्या क्रोधावर संयम ठेवाल आणि सहकार्यांबरोबर वादाची स्थिती टाळाल. आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. मागील उधारी वसुल होईल.

धनु : अधिकार्‍यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

मकर : शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा. दिवस संमिश्र जाईल.

कुंभ : आर्थिक नुकसानीची शयता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.

मीन : धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. व्यापार्‍यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.