आरोग्य

0

थंडीत मुलायम ओठांसाठी

अनेक जण फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम जेली लावतात, परंतु हा पर्याय खरोखरीच
योग्य आहे का? हा विचार करण्याची गोष्ट आहे. त्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप
केअर’ उत्पादनांचा वापर करावा. याच्या वापराने त्वचेतील ओलावा कायम राहण्याबरोबरच
सूर्याच्या दाहकतेपासून त्वचेचा बचाव होण्याबरोबरच चेहर्‍यावरील डार्क स्पॉट कमी होण्यास
देखील मदत होते.

तिळाची बर्फी

0

तिळाची बर्फी

 

साहित्य : २०० ग्रॅम तीळ, २०० ग्रॅम
काजूचे तुकडे, ४०० ग्रॅम साखर, १ १/२
वाटी सायीसहदूध, १/२ चमचा रोझ इसेन्स,
वर्खचा कागद
कृती : सर्वप्रथम तीळ साफ करून
घेणे त्यानंतर चुलीवर मंद आंचेवर भाजावेत
थोडे कमीच भजावे अगदी लालसर होता कामा
नये नंतर मिसरला लावून त्यांची पूड करावी
सोबत काजुचीही पूड करावी. एका पातेल्यात
साखरेत सायीसकट दूध घालून पाक तयार
करून घेणे. पाक तयार झाल्यानंतर त्यात
इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून
ढवळावे मिश्रण एकजीव करून घेऊन लगेच
तूप लावलेल्या पातेल्यात ओतून घेणे गरम
मिश्रण असतानाच त्यावर वर्खाचा कागद
थापावा लगेच बर्फी करण्यास सुरवात करावी
बर्फी झाल्यावर सर्व्ह करून ५-१० मिनिटांनी
थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करावे.

काळ्याभोर केसांसाठी

काळ्याभोर केसांसाठी

कपभर मेंदी, दोन चमचे दही, चमचाभर
कॉफी पावडर, मोठा चमचा आवळा पावडर
आणि छोटा चमचा काताची पावडर हे सारे
एकत्र करून भिजवून ठेवावे. नंतर केसांच्या
मुळाशी व केसांना लावून एका तासाने केस
स्वच्छ धुवावेत. हा प्रयोग आठवड्यातून एकदा
करावा. केस काळेभोर व सुंदर होतील.

सल्ला

0

 

जर कपड्याला च्युईंगम चिकटले असेल
तर ते काढण्यासाठी कपडा एखाद्या पॉलिथीन
बॅगमध्ये ठेवून काही तास फ्रीजमध्ये ठेवा.
यामुळे च्युईंगम कडक होऊन कपड्यापासून
वेगळे होईल.

वास्तू

0

* स्नानगृह पूर्व दिशेस असावे. धुण्याचे
कपडे वायव्येस ठेवावेत. पाणी तापवायचा
बंब, गीझर, हीटर हे आग्नेय दिशेस असावेत.
स्नानगृहातील आरसे दक्षिणेकडे असू नयेत.
पूर्व अथवा उत्तरेकडे असणे श्रेयस्कर ! मुळात
स्नानगृहात शौचालय संडास असू नयेत,
असा पूर्वापारचा वास्तूशास्त्र संकेत आहे.
स्नानगृहात वायव्य कोपर्‍यात साबण, शांपू,
फिनाईल, ब्रश, खराटा इत्यादी सफाईच्या
वस्तू ठेवाव्यात.
* दिवाणखान्यात घड्याळाचे तोंड शयतो
पूर्वेकडे असावे. दिवाणखान्याच्या भिंतींना काळा
वा गडद लाल रंग देऊ नये. दिवाणखान्यातील
भारतीय बैठक पूर्वेला किंवा उत्तरेला असावी.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३

धनुर्मासारंभ, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, धनिष्ठा २६|५४
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.

राशिभविष्य

मेष : आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. आरोग्य उत्तम राहील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल.

वृषभ : एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. व्यापारय्व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल.

मिथुन : इतरांना सहकार्य केल्याने वाद कमी होतील. महत्त्वाची जबाबदारी मिळेल. खर्च वाढेल. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील.

कर्क : स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे विचार पटतील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील.

सिंह : एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल.

कन्या : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. आरोग्य उत्तम राहील. काही काळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल.

तूळ : अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. स्त्री पक्षाचा आधार राहील. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील.

वृश्चिक : उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल. व्यस्त राहाल. यंत्रे व वाहने जपून चालवा. संपत्तीच्या खरेदी- विक्रीसाठीही उत्तम दिवस.

धनु : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. जोडीदाराशी वादविवाद टाळा.

मकर : वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. व्यापार्‍यांसाठी परिस्थिती साधारण.

कुंभ : मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा.

मीन : महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. आपली सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज गंभीर विचार करू शकता.

                                                                                        संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

मनुष्य माणुसकी विसरून जेव्हा दानव बनतो, तेव्हा तो धर्माऐवजी धनाचे,
सत्याऐवजी संपत्तीचे, विरागाऐवजी विलासाचे आणि समतेऐवजी ममतेचे स्वागत करतो.

आरोग्य

0

खोकल्याच्या समस्येतून मुक्ती

खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड
आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्ल्याने खोकला दूर होतो.

खवा, पनीर व बटाटा भजी

0

खवा, पनीर व बटाटा भजी

साहित्य : १०० ग्रॅम पनीर, १००
ग्रॅम बटाटे, १०० ग्रॅम खवा, १०० ग्रॅम मैदा,
मीठ, मिरपूड, मिरची पूड, हिरव्या मिरच्या,
कोथिंबीर, कांदा, ब्रेड, शेंगदाणे, जिरे, लसूण,
पुदिन्याची पाने, चिंच, साखर, काजू, बदाम
तेल.
कृती : बटाटे उकडून कुस्करून घ्या.
मीठ, मिरपूड, मिरची पूड, हिरव्या मिरचीचे
तुकडे कोथिंबीर, कांदा चिरून मिसळा.
पनीराच्या यूबवर हे मिश्रण लपेटा. नंतर
खवा लपेटा. मैद्यात मिरपूड, मीठ मिसळून
पीठ तयार करा. त्यात तयार पनीर रोल
बडवून ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून तळून घ्या.
दुसर्‍या प्रकारच्या भज्यासाठी पनीर, बटाटा,
उकडलेले शेंगदाणे, मीठ, जिरे, मिरची पूड
मिसळून कोथिंबीर टाका व नंतर भज्याचा
आकार देऊन तळा.
हिरवी चटणी : लसूण, मीठ, हिरवी
मिरची, पुदिना व कोथिंबीर, शेंगदाणे टाकून
चटणी तयार करा.
गोड चटणी : चिंच, साखर, काजू,
बदाम, मीठ, मिरची पूड, जिरे, पॅनमध्ये टाका
व तेलात फोडणी द्या व चटणी वाटा.

लिंबाचा असाही वापर

लिंबाचा असाही वापर

* लिंबाच्या सालीत व्हिटॅमिन सी
भरपूर प्रमाणात आढळले जाते. त्याच्या साली
सुकवून त्याची पावडर बनवा. एक चिमूटभर
पावडर फेसपॅकमध्ये घालून ती लावल्यास
त्वचा उजळली जाते.
* चेहर्‍यावर तारुण्यपिटिका येत
असतील तर आंबट दह्याचा लेप चेहर्‍यावर
लावावा आणि सुकल्यानंतर धुवून टाकावा.
दोन-तीन दिवसातच तारुण्यपिटीका नष्ट
होतील.