दैनिक पंचांग शनिवार, दि. १६ डिसेंबर २०२३

0
147

विनायक चतुर्थी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, श्रवण २८|३७
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे.

वृषभ : आपला एखादा मित्र आपल्या विचारांबद्दल महत्वपूर्ण सल्ला देऊ शकतो. वाहने व उपकरणांपासून धोका संभवतो.

मिथुन : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. मागील उधारी वसुल होईल.

कर्क : आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या.

सिंह : आज रात्री विश्रांती घ्या. रहाते घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

कन्या : राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल.

तूळ : घरगुती बाबतीत अधीरता टाळा. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. मागील केलेले प्रयत्न आज फलद्रूप होतींल.

वृश्चिक : ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा.

धनु : निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा.

मकर : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल.

कुंभ : अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या.

मीन : पत्नी व मुले यांच्या सहवासामुळे मानसिक शांतता लाभेल. आपले इप्सित साध्य होण्याचे योग येतील.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर