मसूर डाळ बारीक वाटून दुधात घुसळून
घ्यावी आणि चेहऱ्यावर लावावी. १० मिनिटांनी
चेहरा धुवून घ्यावा. आठवडाभर हा उपाय
सकाळ-संध्याकाळ करावा.
संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, शके १९४५
शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, उ.भा.२२|५८
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल. पैसाही खर्च होईल.
वृषभ : पदोन्नतीचा योग आहे. कार्यलयात अधिकार्यांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती मिळेल.
मिथुन : आपल्याला आज प्रतिकूल दिवस आहे. मानसिक व्यग्रता, शारीरिक शिथिलता अनुभवास येईल.
कर्क : वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून तो दूर ठेवा. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.
सिंह : आज पति-पत्नींचे एकमेकांशी पटणार नाही. बेबनाव होईल, त्यामुळे लेश होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे.
कन्या : व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शयता अधिक आहे. सहकार्यांचे सहकार्य वाढेल.
तूळ : तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील.
वृश्चिक : मित्रपरिवाराशी सावधपणाने वागा असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
धनु : प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा.
भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शक्य आहे.
मकर : आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडतील व मन दुःखी होईल. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल.
कुंभ : आजचा दिवस तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे. परिवारात आनंदी वातावरण असेल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल.
मीन : स्थावर संपत्ती व कोर्ट- कचेरी यांच्या झंझटमध्ये आज पडू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालापाने फायदा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
अॅसिडीटी टाळण्यासाठी उपाय
उपाशीपोटी राहण्याची सवय टाळा. आजच्या जीवनात पोट रिकामे ठेवून दिवसभर कामात
व्यस्त राहणार्या व्यक्तींना हा त्रास खात्रीने होतो. जेवणाच्या वेळा ठराविक असाव्यात. दर चार
तासांनी थोडे थोडे खावे. रात्री जेवल्यावर अर्धा तास शतपावली करावी. चालण्याचा व्यायाम
करून वजन आणि विशेषत: पोट कमी करावे.
पाकातले चिरोटे
साहित्य : रवा, मैदा, साखर, तूप,
आंबट दही, केशर किंवा खाण्याचा केशरी
रंग.
कृती : रवा व मैदा समप्रमाणात
घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा
तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात
भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन
त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर
किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत
असल्यास लिंबू पिळावे.
बेडरुममध्ये हे ठेवू नये
* बेडरूममध्ये झाडू ठेवणे अशुभ होय.
याशिवाय टोपली, घमेले, मुसळ, कढई व
चिमटा या वस्तूही बेडरूममध्ये ठेवणे कटाक्षाने
टाळावे. त्यामुळे वाईट स्वप्न पडतात,
आजार-धुपार उद्भवतात, अकारण अतिचिंता
करण्याची प्रवृत्ती वाढते.
* दाम्पत्यजीवन सुखी करण्यासाठी
तसेच रोमान्म वाढण्यासाठी फेंगशुईप्रमाणे
क्रिस्टल बॉल बेडरूममध्ये टांगावा. यामुळे
घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.
बेडरुममध्ये पाणी असलेले कोणतेही पेंटींग लावू नये, त्याऐवजी एखादी रोमँटिक कलाकृती, युगल
पक्षाचा फोटो लावावा.
—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, पू.भा.२४|०२
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. कलाय्क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल.
वृषभ : स्थायी संपत्ती संबंधी कामांना आज टाळा. दिवस सामान्य जाईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा.
मिथुन : व्यापारात कर्मचार्यांवर जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वृद्धि योग.
कर्क : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल.
सिंह : सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग. आत्मविश्वास वाढेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. कामात अडचणी येतील.
कन्या : वाणी प्रभावामुळे लोकांना आपले मत पटवून द्याल. आर्थिक नुकसान संभव. मानसिक संतोष वाढेल.
तूळ : लांबच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी कळू शकेल. अचानक खर्च वाढेल. कामावर प्रभाव पडेल.
वृश्चिक : आर्थिक स्थिति चांगली राहील. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा.
धनु : धार्मिक कामात मन रमेल. शैक्षणिक क्षेत्रात येणार्या अडचणी संयमाने सोडवा.
मकर : ज्ञान, आध्यात्माच्या उच्चस्तरीय कामात गूढ अनुसंधान योग. नवीन संबंध बनतील. सत्संग होईल.
कुंभ : कर्मकांड अध्यात्म संबंधी कामात मन रमेल. कर्जाची चिंता कमी होईल. प्रेम संबंधात यश प्राप्ति.
मीन : संबंधांना महत्व द्या. नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.