चॉकलेट शंकरपाळे

0

चॉकलेट शंकरपाळे

साहित्य : २ वाट्या मैदा, मोहनासाठी
आणि तळण्यासाठी तूप, पिठीसाखर, कणभर
मीठ, पीठ, भिजविण्यासाठी दूध, अर्धा टी
स्पून व्हॅनिला इसेन्स.
कृती : मैद्यामध्ये साखर, बेकिंग
पावडर, मीठ, व्हॅनिला इसेन्स घालून
नीट मिस करून घ्या. त्यात मूठ वळेपर्यंत
तुपाचे मोहन घालून, तूप सगळ्या मिश्रणाला
नीट चोळून घ्या. हा गोळा अर्धा तास झाकून
ठेवा. कोको पावडरमध्ये दूध घालून घट्टसर
गोळा मळा. भिजविलेले पीठ आणि कोकोचे
गोळा अलगद मिस करा. पूर्ण एकजीव न
करता कोकोच्या मार्बवसारख्या लाइन्स
दिसतील, असं मिस करा. मोठी पोळी
लाटून आवडीप्रमाणे शंकरपाळे लाटून तळा
किंवा ओव्हनमध्ये १८० अंश तापमानावर २०
मिनिटे बेक करा. या शंकरपाळ्यांवर वरून
डेमोरश शुगर भुरभुरा (ब्राऊन शुगर).

वास्तू

0

 

पाण्याचा साठा कोठे असावा
कुठे बोअरिंग करावे, हँडपंप कुठे
बसवायचा, अंडरग्राऊंड टाकी बांधायची
असेल तर योग्य जागा म्हणजे उत्तर वा पूर्व
दिशा निवडावी. याउलट ओव्हरहेड टाकी
मात्र दक्षिण वा पश्चिम बाजूसच असावी.
बांधकाम करताना टाकी लावायची असेल तर
टाकीची शास्त्रोत पूजा-अर्चा करावी.

सल्ला

0

 

दात येताना बाळ रडत असेल तर २
चमचे जाड बडीशेप कपभर पाण्यात उकळा
व ती गाळून ते पाणी एक-एक चमचा
दिवसातून ४ वेळा पाजा.

मजबूत दात

बाभळीच्या आंतील सालीच्या काढ्याच्या
गुळण्या केल्याने दात मजबूत होतात.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २१ डिसेंबर २०२३

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, रेवती २२|०९
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होईल. याची प्रचिती तुम्हाला येईल.

वृषभ : तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल.

मिथुन : आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे

कर्क : तुमच्या हातातून पैसे हरवू देऊ नका. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल.

सिंह : आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपली स्वप्ने प्रत्यक्षात येतील. वैवाहिक आयुष्य चांगले होईल आरोग्य  बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल.

कन्या : आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील.

तूळ : एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. शत्रू पराभूत होतील.

वृश्चिक : सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल.

धनु : आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल.

मकर : आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुम्हाला अपनेक्षीत फायदा होईल.

कुंभ : आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

मीन : स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा.

                                                                                       संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

सुविचार

 

हिंमत ही अंतःकरणातून निर्माण होणारी वस्तू आहे; आकड्यात निर्माण होणारी नाही.

आरोग्य

 

तल्लख स्मरणशतीसाठी

३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती
वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम मुलांना दिल्याने मुलं खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात. सकाळी
शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येतो. शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम
पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि
बुद्धीत वाढ होते.

रवा-बेसनाचे लाडू

0

रवा-बेसनाचे लाडू

साहित्य : १०० ग्रॅम रवा, १ वाटी बेसन
पीठ, १ वाटी साखर व सुकामेवा, बदाम-
जायफळ, काजू, खिसिमिस, एक वाटी
साजूक तूप.
कृती : आधी बेसन पीठ भाजून घ्यावे.
नंतर खवा लालसर भाजून घ्यावा.
त्यानंतर गार झाल्यावर त्यामध्ये
पिठीसाखर मिसळावी. चवीसाठी जायफळ,
वेलची पावडर, बदाम, काजू यांची पूड करून
लाडवामध्ये मिसळावी. याचे लाडू बांधताना
वरून साजूक तूप टाकून हव्या त्या आकाराचे
लाडू वळावेत.

वास्तू

0

घरात अशी चित्रे लावावीत

* पाण्यातील माशाचे चित्र दीर्घायुष्याचा
संकेत देते.
* सूर्योदय, पर्वत किंवा पाणी
दाखवणारी निसर्गचित्रे आशादायी मनोवृत्ती
दर्शवितात.
* भौमितिक आकारातील चित्रे
विध्वंसक विचार वाढवितात.
* कुटुंबाची झपाट्याने भरभराट व्हावी
म्हणून स्वयंपाकघर कधीही घराच्या मधोमन
असू नये.

सल्ला

0

 

लोणचे बरणीत भरण्यापूर्वी तव्यावर चार
निखारे ठेवून त्यावर हिंगाचा छोटा खडा ठेवावा
व त्यावर बरणी पालथी ठेवावी व बरणीत धुरी
द्यावी. धूर निघून गेल्यानंतर लोणचे बरणीत
दाबून भरावे.