फ्रीजमध्ये एका छोट्या प्लॅस्टिक
पाकिटात खायचा सोडा ठेवला तर फ्रीजला
आत ठेवलेल्या वस्तूंचा गंध येणार नाही.
वास्तू
* दाम्पत्यजीवन सुखी करण्यासाठी
तसेच रोमान्म वाढण्यासाठी फेंगशुईप्रमाणे
क्रिस्टल बॉल बेडरूममध्ये टांगावा. यामुळे
घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. बेडरुमम
ध्ये पाणी असलेले कोणतेही पेंटींग लावू नये,
त्याऐवजी एखादी रोमँटिक कलाकृती, युगल
पक्षाचा फोटो लावावा.
* देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा
अधिक मूर्ती अथवा फोटो ठेवू नयेत.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
दैनिक पंचांग मंगळवार, दि. २ जानेवारी २०२४
शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, पूर्वा ११|४२
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
मेष: मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल.
व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.
वृषभ: घरात किंवा पैशांमध्ये वाढझाल्याने आपणास आनंद मिळेल. मित्रांची
मदत मिळेल.
मिथुन : अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये
सावधगिरी बाळगावी लागेल.
कर्क: कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील.
सौंदर्याकडे आकर्षण वाढेल.
सिंह : आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय
निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्याजीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या.
कन्या : कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. नोकरदार व्यक्तींनी
कार्यात सहयोग घेऊन चालावे.
तूळ: मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल.
अनुकूल स्थिती मिळेल. प्रसिद्धी मिळेल.
वृश्चिक: नोकरदार व व्यापारी बंधूंनालाभ मिळेल. नेहमीपेक्षा अधिक चांगले काही
घडण्यासाठी आपणास आपल्या कामातएकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे.
धनु : वाद टाळा. काही अडचणींनंतरयश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती
नरम-गरम राहील.
मकर : व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील.
आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील.
कुंभ: वेळेचा सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात
आलेल्या संधी निसटू देऊ नका. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
मीन : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पत्नी व मुले यांचा उत्तम सहवास लाभल्याने
दिवस आनंदात जाईल. जुने मित्र मंडळी भेटतील. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल.
वाहने व उपकरणे जपून वापरावीत.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
सुगंधीत व मऊ रेशमी केसांसाठी
* जर चेहर्यावर डाग असतील तर मुलतानी मातीत चंदन पावडर, चिमूटभर हळद
व २-३ थेंब कापराचे तेल टाकून चेहर्यावर लेप लावल्यास हळूहळू डाग नाहीसे होतात.
* रिठा-आवळा-शिकेकाई यांची पूड काष्ठौषधीच्या दुकानात मिळते. ते तिन्ही
समप्रमाणात २-२ चमचे घेऊन शुध्द खोबरेल तेलात एकत्र करावी. हे उटणे केसांना व
केसमुळांना लावून १५ मिनिटे आराम करावा. मग स्नान करावे. आठवड्यातून २ दिवस हा
प्रयोग केल्याने केस सुगंधीत व मऊ रेशमी होतात.
खमंग चकली
खमंग चकली
साहित्य – १ किलो तांदुळ, १ मोठीवाटी चणा डाळ, १/२ वाटी मुगडाळ, १/२
वाटी ज्वारी आणि पोहे यांचे मिश्रण, १ वाटीतेल, १ चमचा जिरे, तीळ आणि धने प्रत्येकी
चवीपुरते मीठ व तिखट. तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम तांदुळ, दोन्ही डाळी, पोहे, ज्वारी हे एकत्र करून थोडेसे भाजून
(फक्त गरम होईपर्यंत) घ्यावे. त्यात धने व जिरे घालून हे सर्व मिश्रण दळून आणावे.
वरील मिश्रणाचे पीठ एका ताटात घेऊन त्यात मीठ, तिखट, तीळ, तेल व गरजेपुरते कोमट
पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. यात हळदवापरू नये. चकल्या करून तेलात गुलाबीसर
तळाव्यात.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
सिंह आणि कोल्हा
एका रानात एक सिंह राहत होता; पण बरेच प्रयत्न करूनही त्याला शिकार मिळत नव्हती. भुकेने कासावीस झाला असता त्याने मनात काही विचार केला. त्याने रानात आपण फार आजारी आहोत अशी बातमी पसरेल, अशी व्यवस्था केली. थोड्याच दिवसांनी सिंह महाराज आजारी असल्याचे सर्व प्राण्यांच्या कानावर गेले. महाराजांच्या समाचाराला गेले पाहिजे; नाहीतर त्यांची आपणावर खप्पा मर्जी होऊन त्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल, असा विचार करून रानातले अनेक प्राणी सिंह महाराजांच्या गुहेत गेले. अशा प्रकारे अनेक दिवस रानातले अनेक प्राणी महाराजांच्या समाचारासाठी गुहेत जात होते. रानातले सर्व प्राणी आले; पण अजून कोल्होबा कसे आले नाहीत, असा विचार सिंह महाराजांच्या मनात येताच एके दिवशी याची चौकशी करण्यासाठी त्यांनी लांडगेदादाला कोल्ह्याकडे पाठविले. तेव्हा लांडगेदादा चौकशी करण्यासाठी कोल्होबाकडे आला आणि म्हणाला, “अरे कोल्होबा, आपले सिंह महाराज फारच आजारी आहेत. रानातले सर्व प्राणी त्यांच्या समाचारासाठी आले. मग तुम्ही का बरे आला नाहीत? याची चौकशी करण्यासाठी महाराजांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे. मग बोला, कधी येता समाचाराला?” त्यावर कोल्होबा म्हणाले, “अरे लांडगेदादा, सिंह महाराजांना माझा नमस्कार आणि शुभेच्छा सांगा. त्याचबरोबर त्यांना माझी एक विनंतीही कळवा की, “महाराजांवर माझे पूर्वीइतकेच प्रेम आणि निष्ठा आहे. त्यात कसलाही बदल झाला नाही. त्यांच्यावर माझे पूर्वीइतकेच प्रेम आहे आणि पुढेही राहील. महाराज आजारी पडल्याची खबर मलाही कळली. त्यांची विचारपूस करण्यासाठी जावे, असे मलाही मनापासून वाटते. पण माझ्या मनात काही कुशंका येतात. त्यांची गुहा नजरेस पडताच माझ्या अंगाचा थरकाप उडतो. आजपर्यंत रानातले जे जे प्राणी महाराजांच्या समाचाराला गुहेत गेले, ते अजूनपर्यंत तरी बाहेर आलेले दिसले नाहीत. असे असता मला गुहेत जाऊन महाराजांची विचारपूस करण्याचे धाडस होत नाही. असे आपण महाराजांना कळवा, म्हणजे झाले.” तात्पर्य ः कोणी एखादा लबाड माणूस आपले मतलब साधण्यासाठी काही तरी खोटी-नाटी अफवा पसरवतो. या त्याच्या भूलथापांना बळी पडणे, हे मूर्खपणाचे लक्षण होय.






