दैनिक पंचांग मंगळवार, दि. २ जानेवारी २०२४

0
67

शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, पूर्वा ११|४२
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.


राशिभविष्य-

मेष: मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल.
व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

वृषभ:  घरात किंवा पैशांमध्ये वाढझाल्याने आपणास आनंद मिळेल. मित्रांची
मदत मिळेल.

मिथुन : अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये
सावधगिरी बाळगावी लागेल.

कर्क: कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील.
सौंदर्याकडे आकर्षण वाढेल.

सिंह : आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय
निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्याजीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या.

कन्या : कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. नोकरदार व्यक्तींनी
कार्यात सहयोग घेऊन चालावे.

तूळ: मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल.
अनुकूल स्थिती मिळेल. प्रसिद्धी मिळेल.

वृश्चिक: नोकरदार व व्यापारी बंधूंनालाभ मिळेल. नेहमीपेक्षा अधिक चांगले काही
घडण्यासाठी आपणास आपल्या कामातएकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे.

धनु : वाद टाळा. काही अडचणींनंतरयश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती
नरम-गरम राहील.

मकर : व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील.
आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील.
कुंभ: वेळेचा सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात
आलेल्या संधी निसटू देऊ नका. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

मीन : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पत्नी व मुले यांचा उत्तम सहवास लाभल्याने
दिवस आनंदात जाईल. जुने मित्र मंडळी भेटतील. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल.
वाहने व उपकरणे जपून वापरावीत.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर