मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

हृदयविकार म्हणजे काय?

हृदयविकार याचा शब्दशः अर्थ हृदयाचे रोग असा होतो. मग त्यात हृदयाच्या स्नायूंचे रोग, झडपांचे रोग, कर्करोग, रक्तदाबामुळे वा श्वसनसंस्थेच्या रोगांमुळे हृदयावर होणारे विपरित परिणाम इत्यादींचा समावेश होतो; पण सामान्यपणे लोक हृदयविकार म्हणजे हृदयविकाराचा झटका असेच समजतात. हृदयाच्या सर्व रोगांचे विश्लेषण करणे शय नाही. त्यामुळे आपणही याच दृष्टीने हृदयविकाराचा विचार करू. हृदय आपल्या शरीरात पंपाचे कार्य करते. हृदयाचे सतत आकुंचन प्रसरण होत असते. यामुळे शुद्ध रक्ताचा संपूर्ण शरीराला पुरवठा होतो. या महत्त्वाच्या कार्यात व्यत्यय येऊन चालत नाही. हृदयाचे हे कार्य अविरतपणे चालू असते. त्याला विश्रांती मिळते ती एकदाच- मृत्यूच्या वेळी. इतकेच हृदयाचे महत्त्व! असे कार्य करण्यासाठी हृदयालाही (म्हणजे त्याच्या स्नायूला) रक्तपुरवठा होणे आवश्यक असते. यासाठी रक्तवाहिन्या असतात. काही रोगांमध्ये या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. साहजिकच हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो वा बंद पडतो. रक्तपुरवठा बंद पडल्याने संबंधित भागातील पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला हृदयविकाराचा ‘झटका’ असे नाव पडले आहे. लठ्ठपणा, जास्त प्रमाणात मेद पदार्थांचे सेवन, बैठे काम, अतिरक्तदाब, मधुमेह, मद्यपान, धूम्रपानाची सवय इत्यादी असणार्‍यांच्या बाबतीत हा रोग होण्याची शयता जास्त असते. हृदयाच्या स्नायूचा जास्त भाग प्रसरण पावला, तर शस्त्रक्रिया बंद पडून रुग्ण दगावल्याची शयता असते. योग्य वेळी उपचार झाल्यास मृत्यूचे प्रमाण खूप कमी होते. सुरुवातीला श्रमानंतर छातीत दुखणे अशी इशारेवजा लक्षणे दिसून येतात. त्याच वेळी उपचार केल्यास पुढील अनर्थ टळू शकतो. हृदयाभिलेखाचा रोगनिदानासाठी चांगला उपयोग होतो. रक्तवाहिनीतील अडथळा काढण्यासाठी बायपास शस्त्रक्रिया करता येते. हृदयविकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो टाळलेलाच बरा. दररोज व्यायाम, आहारात मेदपदार्थ कमी खाणे, मद्यपान, धूम्रपान न करणे, उच्च रक्तदाब उपचाराने आटोयात राखणे; अशा उपायांनी हृदयविकाराचा प्रतिबंध करता येईल.

आरोग्य

पांढर्‍या रंगाच्या भाज्यांमुळे आरोग्यास लाभ


पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात सामील केल्याने देखील कर्करोगाची
आणि ट्यूमरची शयता कमी होते. याव्यतिरिक्त हे चरबी कमी करण्यात उपयुक्त असल्यामुळे
हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असतात. पांढर्‍या रंगाच्या भाज्या आणि फळांमध्ये अलिसिन
आणि फ्लेव्होनॉइड भरपूर प्रमाणात आढळते. म्हणूनच आपल्या आहारात केळी, मुळा, बटाटा,
कांदा, नारळ, मशरूम व इतर पदार्थांचा समावेश करू शकता

दैनिक पंचांग रविवार, दि. ३१ डिसेंबर २०२३

शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, मघा अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.


राशिभविष्य-
मेष: महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत
राहाणार नाही. पैशासंबंधी येणार्‍या सर्व अडचणी दूर होतील.

वृषभ : निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू
नये. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. आरोग्य चांगले राहील.

मिथुन : प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची
शयता आहे. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या.

कर्क: प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा
पूर्ण होतील. मागील उधारी वसुल होईल. मागील उधारी वसुल होईल.

सिंह : कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन
देणे टाळा. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील.

कन्या : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा.
आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा.

तूळ: अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद
टाळण्याचे प्रयत्न करा. आपल्या आरोग्याचीकाळजी घ्या. आजचा दिवस व्यवसायासाठी
फायद्याचा ठरेल.

वृश्चिक : कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करापण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका.
व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.कौटुंबिक समाधान लाभेल.

धनु : वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये  प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.                                       व्यापारय्व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल.

मकर: मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील.काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात.
एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यातबराच वेळ जाईल. पैशाचे पाकीट व मौल्यवान
वस्तू चोरी जाण्याची शयता.

कुंभ:  इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ
आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्वपूर्ण कार्यातयश मिळेल. वाहन चोरी होण्याची शयता आहे.

मीन : हुशारीने गुंतवलेले धन आपणासध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले
कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.

                                                                         संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

चंप्या : बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत!
चंप्या : एक किक् मारायला, न् एक गिअर बदलायला.

सल्ला

0

भाजी शिजवण्यासाठी भाजीचे प्रमाण पाहून त्यानुसारच भांडे घ्यावे.

                                                                 संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

वास्तू

0


अभ्यासात मन लागत नाही किंवा केलेला अभ्यास लक्षात रहात नाही, अशी
समस्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर उपाय म्हणून स्वतःच्या स्टडी टेबलवर किंवा
अभ्यासास बसण्याच्या ठिकाणी स्वतःसमोर ‘एज्युकेशन टॉवर’ची स्थापना करावी, असा
सल्ला फेंगशुईने दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती,
स्मरणशक्ती आत्मविश्वास आणि चिकाटी वाढते, अशी फेंगशुईची धरणा आहे.

डोळ्यांची निगा

डोळ्यांची निगा

* धगधगत्या मोसमात डोळ्यांना गारवा द्या.
* उन्हात जाण्यापूर्वी डोळ्यांवर आयप्रोटेटीव्ह क्रीम व गॉगल लावा.
* उन्हाळ्यात डोळ्यांवर फेंट मेकअप् करा.
* उन्हातून परतल्यानंतर डोळ्यांवर ४-५ मिनिटे गुलाबपाण्यात भिजवलेला कापूस
ठेवा.
* स्वच्छ कपडा पाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवल्यासही डोळ्यांची जळजळ
थांबते.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

शेतकर्‍याची आळशी मुले

एका गावात एक शेतकरी राहत होता. दिवसभर शेतात राबून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे. त्याला चार मुले होती. आता ती मोठी झाली होती. पण त्यांना काम करण्याचा, शेतात राबण्याचा फारच कंटाळा. आयते खाऊन टिवल्या-बावल्या करण्यातच त्यांचा वेळ जात असे. आता तो शेतकरी फारच म्हातारा झाला होता. कधी मरण येईल, याचा भरवसा नव्हता. आपल्यानंतर आपल्या मुलांचे कसे होणार, याची त्याला चिंता लागली होती. म्हणून एके दिवशी त्याने आपल्या चारही मुलांना जवळ बोलावून सांगितले, “मुलांनो, माझा आता काही भरोसा नही. मी सर्व जमीन, त्यातील बागा तुमच्या स्वाधीन करतो आहे. याच जमिनीत कुठे तरी मी पैसा पुरून ठेवला आहे. आता नेमका कुठे, ते मला आठवत नाही. तुम्ही सर्व जमीन खोदून काढा. कुठे तरी तो तुम्हाला सापडेल.” हे ऐकून मुलांना फारच आनंद झाला. आयते घबाड हाती पडेल, असे त्यांना वाटले. उद्याच्या उद्या शेतं खांदायला सुरुवात करू, असे म्हणून ते झोपी गेले. सकाळी बघतात, तो म्हातारा मरण पावलेला. मग त्याचे सर्व क्रियाकर्म केल्यावर सर्व आले. जमिनीची चांगली मशागत केली, तर पीक चांगले येऊन पैसाही हाती येतो, हे त्यांना कळून चुकले. वडिलांच्या सांगण्याचा हाच अर्थ, हे त्यांना मनोमन पटले.

तात्पर्य : धन-पैसा कशाही स्वरूपात मिळतो. प्रत्यक्ष पैसाच मिळाला पाहिजे, असे नव्हे.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

हिमोग्लोबिन म्हणजे काय ?

हिमोग्लोबीन म्हणजे आपल्या शरीराचा प्राणच आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिमोग्लोबीन रक्तातील लाल पेशीत असते. हिमोग्लोबीन हे हिम व ग्लोबीन या दोन घटकांचे बनलेले असते. ग्लोबीन हे एक प्रथिन असून हिम या रंगद्रव्यात पार्फायरीन असते. पार्फायरीनमध्ये लोह असते व चार पायरॉल रचना असतात. हिमोग्लोबीनच्या या विशिष्ट रचनेमुळे ते ऑसिजन वा कार्बनडायऑसाईडशी संयोग पावते व अनुक्रमे ऑसी व कार्बोसी हिमोग्लोबीन तयार होतात. या त्याच्या गुणधर्मामुळेच शरीराला ऑसिजन पुरविणे व शरीरात तयार झालेला कार्बन डायऑसाईड फुप्फुसापर्यंत पोहोचविणे, हे कार्य ते करू शकते. हिमोग्लोबीन लाल असते व त्यामुळे रक्ताला लाल रंग असतो. फुप्फुसामध्ये कार्बोसी हिमोग्लोबीनमधून कर्बवायू सोडला जातो व ऑसिजनशी हिमोग्लोबीनचा संयोग होऊन ऑसिहिमोग्लोबीन तयार होते. त्याद्वारे शरीरात ऑसिजनचा पुरवठा होतो. हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी प्रथिने, जीवनसत्वे लोह यांची आवश्यकता असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होण्यास रक्तक्षय असे म्हणतात. प्रौढ माणसाच्या रक्तात दर मिलीला १३ ते १५ ग्रॅम इतके हिमोग्लोबीन असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यासाठी समतोल आहार, हिरव्या पालेभाज्या यांचे खूप महत्त्व आहे. गरज पडल्यास लोहाच्या गोळ्या देऊन वा औषध देऊन वा क्वचित प्रसंगी व्यक्तीस रक्त देऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविता येते. माणूस गुदमरल्यास वा श्वसनात ऑसिजन न मिळाल्यास रक्तातीत कार्बोसी हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. माणूस निळसर दिसतो. त्याला श्वास घेता येत नाही. दम लागतो व मृत्यूही ओढवतो. असे हे हिमोग्लोबीन.

 

सुविचार

शौर्याचा अर्क म्हणजे कीर्ती. – सुविचार संग्रह