नायलॉन पोह्यांचा चिवडा

नायलॉन पोह्यांचा चिवडा

साहित्य : अर्धा किलो नायलॉन पोहे, १ कप भाजून सोललेले दाणे, अर्धा कप खोबर्‍याचे अतिशय पातळ काप, १ कप डाळ, ६-७ हिरव्या मिरच्या, कढीलिंबाची अर्धा कप पाने धुऊन, पुसून, चिरून, मीठ, पिठीसाखर, जिरेपूड, नेहमीची जास्त हिंग घातलेली फोडणी, थोडे साजूक तूप.

कृती : पूर्वतयारी करून ठेवा. हे पोहे फार नाजूक असतात. म्हणून शयतो, मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्या. खोबरे, दाणे, डाळं तळून घ्या. तुपाची फोडणी बनवून त्यात मिरच्या, कढीलिंब परता. पोहे, डाळ, दाणे, खोबरे, जिरेपूड, मीठ, साखर इ. घालून चांगले ढवळून घ्या. (गॅस बंद ठेवा) गार झाल्यावर डब्यात भरा.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

एका वनात एक सिंह राहत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. फारच गरम होऊ लागले म्हणून सिंहाची स्वारी एका छायाळ वृक्षाखाली आरामात झोपी गेली. तेथेच उंदरांची वस्ती होती. शांत झोपलेले सिंह महाराज पाहून उंदीर त्याच्या अंगा-खांद्यावर खेळू लागले. थोडा वेळ सिंहाने हे कसे तरी सहन केले; परंतु उंदरांचा त्रास फारच वाढल्याने त्याची झोपमोड झाली. रागानेच त्याने एका उंदराला आपल्या पंज्यात पकडले. त्याला आता फाडून खाणार, तोच उंदराने गयावया करीत त्याला म्हटले, “महाराज, चुकलो मी. मला क्षमा करा. पुन्हा माझ्या हातून अशी आगळीक घडणार नाही. आपण तर सर्व प्राण्यांचे राजे. आपण महान. मी तर आपणापुढे अगदीच किरकोळ. माझ्या रक्ताने आपले पवित्र हात विटाळू नका. मला जीवदान देणे हे आपल्या मोठेपणाला साजेसे होईल.” हे ऐकून सिंहाला त्याची दया आली. त्याने उंदराला सोडून दिले. जाता-जाता उंदीर म्हणाला, “सिंह महाराज, मी आपले उपकार जन्मात विसरणार नाही.” अशा प्रकारे काही दिवस गेले. सिंह महाराज असेच एकदा वनात फिरत फिरत नेमके त्याच झाडाखाली आले. तेथे शिकार्‍याने आधीच एक जाळे लावले होते. त्यात सिंह महाराज अडकले. जाळ्यात जेरबंद होताच सिंहाने सर्व शक्ती एकवटून जाळ्यातून सुटण्याचा प्रयत्न केला असता तो त्यात जास्तच गुरफटला. अखेर निराश झालेला सिंह रागाने ओरडू लागला. हा आवाज उंदराने ओळखला. तो धावतच सिंहाजवळ आला. पाहतो, तर सिंह महाराज जाळ्यात फसलेले. मग उंदीर म्हणाला, “महाराज, असे निराश होऊन भिऊ नका. स्वस्थ पडून राहा.” असे म्हणत उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात सिंह महाराज जाळ्यातून मोकळे झाले. त्यांच्यावरील संकट टळले. सिंहाने केलेल्या उपकाराची परतफेड उंदराने अशा प्रकारे केली.

तात्पर्य : कोणाला कमी हलके समजू नये. आपण एखाद्यावर उपकार केले, तर ऐन वेळी त्यातील एखादा तरी आपल्या मदतीला धावून येतो.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

सुई केव्हापासून अस्तित्वात आहे?

अत्यंत छोटी दिसणारी सुई ही आपल्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी वस्तू आहे. सुईने महाभारतात प्रसिद्धी मिळवली ती दुर्योधनामुळे. ’सुईच्या अग्रावर मावेल एवढीसुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही’ असे त्याचे उद्गार प्रसिद्धच आहेत. म्हणजे सुई ही त्याच्या आधीपासून अस्तित्वात होती. आदिमानव जेव्हा वल्कले आणि प्राण्यांची कातडी वापरत होता, तेव्हा त्याच प्राण्याच्या हाडांचे तुकडे तो सुई म्हणून वापरायचा आणि दोरा म्हणजे त्या प्राण्याचेच आतडे किंवा कातडीचे तुकडे असायचे. कापडाचा शोध लागल्यावर काटे किंवा कधी कधी तांब्याच्या सुया वापरात यायला लागल्या, पण या सुयांना नेढे नसायचे. चिनी लोकांनी प्रथम लोखंडी सुया केल्या. तिथून या युरोपात पोचल्या. जर्मनीत न्यूरेंबर्ग येथे युरोपमधला आद्य सुईनिर्मितीचा कारखाना होता. पहिल्या एलिझाबेथच्या काळात एलियास ग्राउज् या जर्मन माणसाने इंग्लंडमध्ये सुई कशी करायची हे तंत्र नेले. तिथून मग सुईचा जगभर प्रसार झाला.

सुविचार

दुसर्‍यांना मारण्यात पराक्रम नाही; पण स्वतः मरण्यात आहे. कोणाची प्रतिष्ठा नष्ट करण्यात पराक्रम नसून, ती बचावण्यात आहे.

आरोग्य

पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे


पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे,
उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने जंतुसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या
दिवसांत काही पदार्थ टाळले पाहिजेत. या दिवसांत सलाड खाणे टाळावे. कापल्यानंतर फळे
लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅटेरियाची वाढ होते

दैनिक पंचांग बुधवार, दि. ३ जानेवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, उत्तरा १४|४६
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.

राशिभविष्य

मेष : आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. राजकीय
व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल.

वृषभ : इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शयता. महत्त्वाची
कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील.

मिथुन : नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.

सिंह : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील.

कन्या : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपली कामे धाडसाने करा. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. काम व इच्छित योजनेला अमलात आणावे.

तूळ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. अधिकार्यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे.

वृश्चिक : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. अमित्रांपासून, सहकार्‍यांपासून लाभ मिळेल.

धनु : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. नोकरदार कामात व्यस्त राहातील. पेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. मान सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

मीन :अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील.

                                                                                       संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

आरोग्य

ओवा किडनीस्टोनसाठी टॉनिक

ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात,
मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा, असा डॉटरही सल्ला देत असतात. कारण,
लघवीला चालना देण्यात ओवा उपयुत ठरता

चिरोटे (पाकातील)

चिरोटे (पाकातील)

साहित्य : रवा, मैदा, साखर, तूप,
आंबट दही, केशर किंवा खाण्याचा केशरी
रंग.
कृती : रवा व मैदा समप्रमाणात
घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा
तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात
भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन
त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर
किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत
असल्यास लिंबू पिळावे.

ओठांची निगा

ओठांची निगा

ओठांना जर भेगा पडत असतील तर
शुद्ध तूप आणि गुलाबपाणी एकत्र करून हे
मिश्रण रात्री झोपताना ओठांना चोळावे.