मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
29

सुई केव्हापासून अस्तित्वात आहे?

अत्यंत छोटी दिसणारी सुई ही आपल्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी वस्तू आहे. सुईने महाभारतात प्रसिद्धी मिळवली ती दुर्योधनामुळे. ’सुईच्या अग्रावर मावेल एवढीसुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही’ असे त्याचे उद्गार प्रसिद्धच आहेत. म्हणजे सुई ही त्याच्या आधीपासून अस्तित्वात होती. आदिमानव जेव्हा वल्कले आणि प्राण्यांची कातडी वापरत होता, तेव्हा त्याच प्राण्याच्या हाडांचे तुकडे तो सुई म्हणून वापरायचा आणि दोरा म्हणजे त्या प्राण्याचेच आतडे किंवा कातडीचे तुकडे असायचे. कापडाचा शोध लागल्यावर काटे किंवा कधी कधी तांब्याच्या सुया वापरात यायला लागल्या, पण या सुयांना नेढे नसायचे. चिनी लोकांनी प्रथम लोखंडी सुया केल्या. तिथून या युरोपात पोचल्या. जर्मनीत न्यूरेंबर्ग येथे युरोपमधला आद्य सुईनिर्मितीचा कारखाना होता. पहिल्या एलिझाबेथच्या काळात एलियास ग्राउज् या जर्मन माणसाने इंग्लंडमध्ये सुई कशी करायची हे तंत्र नेले. तिथून मग सुईचा जगभर प्रसार झाला.