नायलॉन पोह्यांचा चिवडा

0
57

नायलॉन पोह्यांचा चिवडा

साहित्य : अर्धा किलो नायलॉन पोहे, १ कप भाजून सोललेले दाणे, अर्धा कप खोबर्‍याचे अतिशय पातळ काप, १ कप डाळ, ६-७ हिरव्या मिरच्या, कढीलिंबाची अर्धा कप पाने धुऊन, पुसून, चिरून, मीठ, पिठीसाखर, जिरेपूड, नेहमीची जास्त हिंग घातलेली फोडणी, थोडे साजूक तूप.

कृती : पूर्वतयारी करून ठेवा. हे पोहे फार नाजूक असतात. म्हणून शयतो, मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्या. खोबरे, दाणे, डाळं तळून घ्या. तुपाची फोडणी बनवून त्यात मिरच्या, कढीलिंब परता. पोहे, डाळ, दाणे, खोबरे, जिरेपूड, मीठ, साखर इ. घालून चांगले ढवळून घ्या. (गॅस बंद ठेवा) गार झाल्यावर डब्यात भरा.