आरोग्य

केसांच्या आरोग्यासाठी

मेथ्यांचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते कुटून त्याची पेस्ट बनवावी. आंघोळीपूर्वी
तासभर ती पेस्ट केसांच्या मुळाशी लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि भरपूर पाण्याने
केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस गळण्याचे कमी होते आणि केसातील कोंडा दूर होतो.

तिखट शंकरपाळे

तिखट शंकरपाळे

साहित्य : २ वाट्या गव्हाचे पीठ, दीड
चमचा साखर, थोडी हळद, अर्धा चमचा मीठ,
पाव चमचा जिरे, तेल.
कृती : गव्हाच्या पिठात तिखट, मीठ,
हळद, जिरे एकत्र करून पाणी घालून घट्ट पीठ
भिजवावे. गोळे करून पातळ पोळी लाटून
कातणीने बारीक शंकरपाळ्या कापाव्यात व
मंद गॅसवर तेलात लाल रंगावर तळाव्यात.

सल्ला

* नेहमी ३० एसपीएफ ग्रेडची सनस्क्रीन
वापरावी. यामुळे बॅकलेस ड्रेस वापरला तरी
त्वचा काळी पडत नाही.

कोरड्या त्वचेसाठी

कोरड्या त्वचेसाठी

* थंडीमध्ये कोरड्या त्वचेवर संत्र्याचे
साल चोळल्याने तेजस्वीपणा येतो.
* ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम तेलाचे
मसाज, तसेच कोमट पाण्याने अंघोळ हा
थंडीमधील कोरड्या त्वचेसाठी उत्तम उपाय
आहे.
* ५० ग्रॅम रीठे, ५० ग्रॅम सुके आवळे व
५० ग्रॅम शिकेकाईच्या शेंगा एकत्र कुटून घ्या.
त्यात दोन लिटर पाणी मिसळून अर्धा तास
मंद जाळावर उकळावे. थंड झाल्यावर एका
बाटलीत भरून ठेवावे.

वास्तू

दुकान आणि शोरूममध्ये छतावर आरसे
लावले जातात. दुकान आणि शोरूममधील
छतावर ईशान्य दिशेला आणि मध्यभागी
आरसा लावू नये. आरशाची फ्रेम तुटल्यास
तत्काळ दुरुस्त करून घ्यावी किंवा आरसा
तुटल्यास त्वरित बदलावा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ४ जानेवारी २०२४

कालाष्टमी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, हस्त १७|३३                                             सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य-

मेष : नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे
सफल होतील. व्यवसाय क्षेत्रात अधिकारी व सहकारी नकारात्मक वागतील.

वृषभ:  आपल्या सहकार्यांबरोबरझालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा
प्रयत्न करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.गृहिणी आज असंतुष्ट राहतील.

मिथुन :  मोठ्यांचा सहवास लाभेल,त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात
असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

कर्क : विशेषतः धंदा-व्यवसाय करण्यार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस
आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल.अजीर्णचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन यात
रस वाटेल.

सिंह : भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम
करायला उत्साह वाटणार नाही. मित्र व स्नेही भेटल्यामुळे आनंदात असाल.

कन्या : रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर
संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील.

तूळ : आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार
नाहीत. सरकार विरोधी कारवायांपासून दूर राहणच आज फायदेशीर होईल.

वृश्चिक : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल.
आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते.                                                विनाकारण खर्च होईल.

धनु :  प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.चर्चा- वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील.
कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. धनआणि किर्तीची हानी होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून
सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.

मकर:  हा वेळ आपल्या एखाद्याआवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.
आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य
बिघडणार नाही याकडे लक्ष द्या.

कुंभ : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे यावेळी
आपल्यासाठी फलदायी आहे. कामातसांभाळूनच पुढे चला.

मीन : जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये
स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!


पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,
पक्या परिक्षेची तयारी झाली का ?
पक्या  : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर
आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे.

वास्तू


बंदिस्त ठिकाणी शौचालय, धान्याचे  कोठार किंवा निरुपयोगी सामान, जुने फर्निचर,
रद्दी अशी भरताड असते. त्या गृहिणीला वैधव्य, पोटच्या अपत्यांचा अवेळी किंवा
तारुण्यात मृत्यू अशा गंभीर यातनांना सामोरे जावे लागते. कधी तर त्यांना पुत्रप्राप्तीही होत
नाही. झाल्यास संततींना शारीरिक व्यंगांचा त्रास होतो. संततीला संतती होत नाही. निर्वंश
होण्याचीही वेळ येते.
   संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला


* बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.

रुक्ष चेहर्‍यासाठी


रुक्ष चेहर्‍यासाठी
चेहरा रुक्ष असेल तर २ चमचे ताजी
मोहरी वाटून त्यात १ चमचा दूध व चिमूटभर
हळद मिसळून पेस्ट बनवून लावा व १०
मिनिटांनंतर चेहरा धुवा.