सुविचार

परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य व आत्म्याचे भूषण आहे. – प्रेमचंद

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ११ जानेवारी २०२४

दर्श-वेळा अमावास्या, शके १९४५
शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, पू.षा.१७|३९
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.

राशिभविष्य

मेष : नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. आजचा दिवस महत्वपूर्ण ठरेल.

वृषभ : आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल.

मिथुन : मोठ्यांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील. व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल.

कर्क : विशेषतः धंदा-व्यवसाय करणार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल. काही
गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील.

सिंह : भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम करायला उत्साह वाटणार नाही.

कन्या : रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या.

तूळ : आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवायांपासून दूर राहणच आज फायदेशीर होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील.

वृश्चिक : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल.

धनु : प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चर्चा-वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. धन आणि किर्तीची हानी होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.

मकर : हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना
प्रेरणा मिळेल. आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्याल.

कुंभ : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे यावेळी आपल्यासाठी फलदायी आहे. कामात
सांभाळूनच पुढे चला. कोर्ट कचेरीपासून दूरच राहा.

मीन : राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. भागीदाराबरोबर सुद्धा मतभेद होऊ शकतात. आज आपल्या स्वतः च्या तर्कांना बळ मिळू शकेल.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

या संसारात ईश्वराचे भय इतर सर्व भयांपासून मनुष्याला मुक्त करीत असते. : जुन्नुन

याने ब्लडशुगर संतुलित होते

0

याने ब्लडशुगर संतुलित होते

हिरव्या वाटाण्यातील उच्च फायबर आणि प्रोटीन शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित
ठेवते. वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑसिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम
डाळिंब करते.

क्रिमी मँगो

0

क्रिमी मँगो

साहित्य : गोडसर ताजा आंबा रस
अर्धी वाटी, दूध अर्धी वाटी, फेसलेले क्रीम
अर्धी वाटी, थोड्या आंबा फोडी व आईसिंग
शुगर, दोन मोठे चमचे.
कृती : आंबा रस दूध एकत्रित मिसळून
फेस येईपर्यंत चांगले घुसळून घ्या. फेसलेल्या
क्रीममध्ये साखर टाकून फेसून एकजीव करा
व आंबा रसात घाला. ढवळा. सर्व्ह करताना
ग्लासात ओतून त्यात थोड्या आंबा फोडी
टाका.

घरगुती फेसपॅक

घरगुती फेसपॅक

मुलतानी माती पावडर, चंदन पावडर,
संत्र्याच्या सालीची पावडर, लिंबांच्या सालीची
पावडर व लिंबू रस समप्रमाणात मिसळून हे
द्रावण एका बाटलीत भरुन ठेवा. जेव्हा याचा
फेसपॅक म्हणून उपयोग करायचा असेल तेव्हा
या बाटलीतील थोडे द्रावण घ्या व त्यात कच्चे
दूध, गुलाबपाणी मिसळून चेहर्‍यावर लावा.
झाला तुमचा घरगुती फेसपॅक तयार!

सल्ला

0

बटाट्याच्या भाजीत रस्सा जास्त झाला
असेल तर ती भाजी अधिक घट्ट बनवण्यासाठी
त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन टाका व
वरुन थोडेसे मीठ मिसळा. चवीसाठी चाट
मसालाही मिसळू शकता.

वास्तू

0

दागिन्यांच्या दुकानासाठी

गुलाबी, पांढरा, क्रीम, पिवळा रंग शुभ आहे.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग बुधवार, दि. १० जानेवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर,मार्गशीर्ष कृष्णपक्ष, मूळ १९|४०
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.

राशिभविष्य

मेष : आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस.

वृषभ : स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील.

मिथुन : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल.

कर्क : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा.

सिंह : मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा.

कन्या : स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल.

तूळ : कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.

वृश्चिक : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका.

धनु : एखाद्या महत्वाच्या प्रोजेटमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शयता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या.

मकर : हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील.

कुंभ : देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.

मीन : जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

 

मनुष्य स्वतःच स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे. : स्वामी रामतीर्थ