उपवासाचे (वर्‍याच्या तांदळाचे) मोदक

0
45

उपवासाचे (वर्‍याच्या तांदळाचे) मोदक

साहित्य : २ फुलपात्रे वर्‍याच्या
तांदुळाचे पीठ, २ वाट्या साखर, १ मोठा
नारळ, ७-८ वेलदोडे, २५ ग्रॅम बेदाणा, २
टेबलस्पून तूप, १ केळे (हवे असल्यास)
कृती : नेहमीप्रमाणे नारळ व साखर
यांचे सारण तयार करावे. त्यात वेलदोड्याची
पूड व बेदाणा घालावा. केळे बारीक चिरून
आयत्या वेळी घालावे (हवे असल्यास).
वर्‍याचे तांदूळ घरी दळावे व चाळणीने पीठ
चाळून घ्यावे.
२ फुलपात्रे पाणी गॅसवर ठेवून, पाण्यातच
मीठ व तूप घालावे. पाण्याला उकळी आली,
की त्यात वर्‍याचे पीठ पेरावे व उलथण्याच्या
टोकाने ढवळावे. झाकण ठेऊन वाफ येऊ
द्यावी. नंतर खाली उतरवून २ मिनिटांनी
उकड चांगली माळून, नेहमीप्रमाणे अगर साचा
वापरुन मोदक करावेत. हे मोदक उपवासाला
सुद्धा चालतात.