मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
34

वडस म्हणजे काय?

वडस हा डोळ्यांचा विकार आहे, तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांचा नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणार्‍या या पडद्याला वडस असे म्हणतात. वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतीमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो. वडस म्हणजे डोळ्यातली श्लेष्मल आवरणाची एक त्र्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या बाजूने वाढते. बाहुलीवर पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्याने क्वचित एकाऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात. वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत असेल तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरे होते.