इमामपूर घाट परिसरात पेटलेल्या वनव्यात शेकडो हेटर वनसंपदा झाली जळून खाक

0
114

२० तासांनंतर आग विझविण्यात यश, पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या वन्यप्राण्यांना वणव्याचा मोठा फटका

नगर – नगर तालुयातील वनसंपदेला चालू वर्षी वणव्याने मोठा फटका बसला असल्याचे चित्र असतानाच २७ मार्च रोजी
दुपारी २ वाजेच्या सुमारास इमामपूर घाटातील जंगलाला लागलेल्या वणव्यात शेकडो हेटर वनसंपदा जळून खाक झाली आहे. नगर, नेवासा व राहुरी तालुयातील सीमेवर वणवा लागल्याने तिन्ही तालुयातील वनक्षेत्र तसेच आर्मीचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. तब्बल २० तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर हा वणवा विझविण्यास वन विभाग आणि नागरिकांना यश आले.

नगर, राहुरी व नेवासा तालुयाची सीमा इमामपूर घाट परिसरात आहे. या सीमेवर मोठी वनसंपदा पहावयास मिळते. खोसपुरी, गुंजाळे, इमामपूर, पांढरीपुल या हद्दीतील वनसंपदेला २७ मार्चला लागलेल्या वणव्यात मोठी हानी पोहोचली आहे. आर्मीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे तर वन विभागाच्या क्षेत्रालाही मोठी हानी
बसल्याचे पहावयास मिळाले. दिवसभर वणवा भडकत होता.

रात्री उशिरापर्यंत वणव्याने रौद्ररूप धारण केले होते. नगर, राहुरी, नेवासा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु वाळलेले गवत व झाडांचा पालापाचोळा यामुळे वणव्याने रौद्ररूप
धारण केले त्यातच कडक ऊन यामुळे वणवा विझविण्यासाठी मोठी अडचण येत होती. औषधी वनस्पती तसेच मोठ्या वृक्षांना देखील वणव्याचा फटका बसला आहे. वन्यप्राणी जीवाच्या आकांताने सैरावैरा धावताना पहावयास मिळाले. यापूर्वी तालुयातील गुंडेगाव, नगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीतील चिचोंडी पाटील परिसर, इमामपूर, बहिरवाडी, गोरक्षनाथ गड, खोसपुरी या गावांसह विविध गावांमध्ये वनसंपदा वणव्यामुळे नष्ट झाली आहे. चालू वर्षी वणवा लागण्याच्या घटनांमध्ये
मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. वन विभागाने जाळ रेषा केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे परंतु काही भागात जाळ रेषाच नसल्याचे नागरिक सांगत आहेत. २७ मार्चला लागलेल्या वनव्यात राहुरी  तालुयातील धुमा डोंगर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आढळून येतो. तसेच आर्मीचे व वनक्षेत्र देखील मोठे आहे. खिरणीचा महादेव हे धार्मिक स्थळ निसर्गाच्या कुशीतच वसलेले आहे. येथे पर्यटकांची देखील मोठी गर्दी
होत असते. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच पण होत असते. याच निसर्गसंपदेला लागलेल्या वणव्यामध्ये मोठी हानी झाल्याने नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. इमामपूर परिसरातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वणवण भटकंती करत
असतानाच लागलेल्या वणव्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इमामपूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील वन्य प्राण्यांसाठी देखील पाण्याची सोय करण्याची गरज आहे. या परिसरात लागलेल्या वणव्यामुळे हरण, रानडुक्कर, काळवीट, ससा, सरपटणारे साप, सरडा, घोरपड, मोर तसेच विविध जातींचे
पक्षी जीवाच्या आकांताने सैरा वैरा धावत होते.
वणवा विझवण्यासाठी नगर, राहुरी, नेवासा येथील वनाधिकारी व कर्मचारी दुपारपासूनच प्रयत्न करत होते. परंतु रात्री उशिरापर्यंत आग आटोयात आणणे शय झाले नाही.राहुरी तालुका वनपाल राजेंद्र रायकर, वनकर्मचारी बबन जाधव, महादेव शेळके, गोरख मोरे, नेवासा तालुका वनरक्षक राहुल शिसोदे, वन कर्मचारी ज्ञानदेव गाडे, नगर तालुका संजय सरोदे यांच्यासह विविध कर्मचारी वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर २८ मार्चला सकाळी ११
च्या सुमारास ही आग आटोयात आली. आग विझवण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश तेलोरे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. वनपाल मनेष जाधव, वनमित्र सनी गायकवाड, रुद्रा टिमकरे, अंकुश मोकाटे, आप्पासाहेब
टिमकरे, संकेत जरे संदीप टिमकरे संकेत टिमकरे दिपक आवारे राम मोकाटे भिमराज मोकाटे यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली. वणवा लागू नये यासाठी काळजी घ्यावी वणवा लागल्यामुळे वनसंपदेचे तसेच वन्य
प्राण्यांचे अतोनात हाल होत असतात. त्यामुळे वणवा लागू नये यासाठी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. वनक्षेत्रालगतचे बांध शेतकर्‍यांनी जाळू नये. तसेच वनक्षेत्रात धूम्रपान, स्वयंपाक करू नये. वणवा लागल्यास वणवा
विझवण्यासाठी स्थानिकांनी वनविभागाला मदत करणे गरजेचे आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी सांगितले