नगर – नगरकरांमध्ये पर्यटनाची संस्कृती रूजविणार्या ट्रेककॅम्प संस्थेचा वर्धापनदिन इमामपूर येथील खिरणीचा
महादेव ट्रेकमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी निसर्गाशी एकरूप होत पर्यटनाचा आनंद लुटला.
नागरिकांना पर्यटनाची आवड निर्माण व्हावी यासाठी १३ वर्षांपूर्वी विशाल लाहोटी यांनी ट्रेककॅम्प या संस्थेची
स्थापना केली. मात्र, सुरुवातीला पर्यटनाबाबत फारशी उत्सुकता नसल्याने ट्रेकला अल्प प्रतिसाद मिळत असे. त्यानंतर लाहोटी यांनी ट्रेकॅम्पच्या माध्यमातून ‘साद गर्भगिरीला’ हा उपक्रम सुरू केला. त्यास मात्र अबालवृद्धांचा भरभरून प्रतिसाद
मिळत आहे.
वर्धापनदिनानिमित्त रविवारी भल्या पहाटे निसग्रप्रेमी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल महाराजाजवळ जमले. तेथे सर्वांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर सर्वजण दुचाकी, चारचाकीवर नगर तालुयातील इमामपूर गावातून डोंगराच्या
कुशीत वसलेल्या खिरणीच्या महादेव मंदिराजवळ पोहोचले. तेथे सर्वांनी एकत्रितपणे व्यायाम केला. नंतर स्वयंसेवकांच्या
मार्गदर्शनाखाली डोंगरात भटकंती करण्याचा आनंद लुटला. डोंगरात असणारी विविध वनस्पती, फुले आदींबरोबरच नागरिकांनी सेल्फीचा आनंद घेत मनमुराद फोटो काढले. गरमागरम कॉफी आणि स्वादिष्ट भेळीचा आनंद घेतल्यानंतर केक कापून संस्थेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. लाहोटी यांनी ट्रेककॅम्प संस्थेचा उद्देश व वाटचालीबाबत
माहिती दिली. नंतर महादेव मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन सर्वजण नगरकडे परतले.