बटाट्याच्या भाजीत रस्सा जास्त झाला
असेल तर ती भाजी अधिक घट्ट बनवण्यासाठी
त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन टाका व
वरुन थोडेसे मीठ मिसळा. चवीसाठी चाट
मसालाही मिसळू शकता.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. ४ जून २०२४
भौमप्रदोष, शिवरात्रि, शके १९४६
क्रोधीनामसंवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, भरणी
२२|३५
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.
राशिभविष्य
मेष : अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.
वृषभ : कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल. पोरकटपणा करणे टाळा.
मिथुन : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा.
आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. काही नवीन संधी मिळतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल.
सिंह : वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न कराल. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे. शांत राहाण्याचा प्रयत्न करा.
कन्या : मनावर नियंत्रण ठेवाल. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात वेळ जाईल. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.
तूळ : कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
वृश्चिक : कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. आरोग्य उत्तम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. आपली प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे.
धनु : कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. शत्रू पराभूत होतील. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.
मकर : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. हुशारीने
गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.
कुंभ : काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. घरातील वातावरण आनंददायी राहील. कौटुंबिक सदस्यांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल.
मीन : आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आरोग्य मध्यम राहील. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
पहिला चष्मा कुठं वापरला गेला?
पहिला चष्मा कुठं वापरला गेला?
जगरहाटी आमूलाग्र बदलून टाकणारा शोध कोणता असा प्रश्न विचारला गेला, तर आपल्याला अग्नि, चाक, मुद्रणयंत्र आणि अर्थातच पर्सनल कॉम्प्युटर किंवा सेलफोन यांची आठवण होईल. ती तशी चुकीचीही असणार नाही. पण अतिपरिचयादवज्ञा म्हणतात त्याची प्रचिती म्हणूनच की काय आपल्याला साध्यासुध्या चष्म्यांची आठवण येणार नाही. पण विचार करा चष्म्याचा शोध लागला नसता तर किती जणांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली असती. मोटार किंवा असंच दुसरं कोणतंही वाहतुकीचं साधन चालवणं तर सोडाच पण साधं रस्त्यावरून चालणंही मुश्कील झालं असतं. कशाचंही वाचन करणं अशय होऊन बसलं असतं आणि ते सर्व सोडून नुसता टीव्ही बघायला म्हटलं तरी तेही साध्य झालं नसतं. तरीही या अतिशय उपयुक्त साधनाचा शोध कुठं आणि कधी लागला, याविषयी छातीठोकपणे काहीही सांगता येणे शय नाही. तसा काचेचा शोध चार हजार वर्षांपूर्वीच लागला होता. पण त्या काचेपासून घासून घासून भिंग बनवता येतात याचा पत्ता मानवाला लागला नव्हता. तो लागला तेव्हाही त्यातून वस्तूची प्रतिमा वृद्धिंगत करणार्या मॅग्निफाइंग ग्लास तयार केल्या गेल्या. त्यांनाच मग वेगवेगळ्या मखरांमध्ये बसवून त्याच्यापासून हातात धरून वस्तू पाहण्यासाठीची साधनं बनवली गेली. पण त्यांना चष्मा म्हणता येणार नाही. कारण एक तर ते साधन हातात धरून एखादी वस्तू न्याहाळता येत असे. पण ते सतत डोळ्यांसमोर धरून वाटेवरून चालणं किंवा वाचन करणं शय नव्हतं.
पुढं क्वार्ट्झ या निसर्गात मिळणार्या पदार्थापासून भिंग तयार करता येतात याचा शोध लागल्यावर चष्मा बनवायला सुरुवात झाली. असे पहिले इटलीमध्ये १२६८ ते १२८९ या काळात तयार केल्याचा पुरावा मिळाला आहे. डॉमिनिकन धर्मगुरू जोर्दानो द पिस्का याने २३ फेब्रुवारी १३०६ या दिवशी दिलेल्या प्रवचनामध्ये आपली दृष्टी सुधारणार्या या चष्म्याचा वापर सुरू होऊन वीस वर्षही उलटली नाहीत, असं स्पष्टपणे म्हटलं होतं. ही भिंगं जनावरांची हाडं, कातडी किंवा धातू यापासून तयार केलेल्या फ्रेममध्ये बसवली जात. अशा प्रकारचे चष्मे अर्थात नाकावर एका घट्ट बसणार्या चापानं बसवले जात. हे सोईचं नव्हतं आणि काही वेळ गेल्यानंतर नाकाचा तो भाग दुखायला लागे. पण त्या फ्रेमला काड्या जोडून त्या कानांवर ठेवल्या तर चष्मा कोणतीही वेदना न जाणवता दीर्घ काळ वापरता येऊ शकतो, याचा शोध लागायला आणखी चारशे वर्षं लोटावी लागली. आज वापरले जातात तशा प्रकारचे चष्मेही युरोपातच, इटली व फ्रान्स इथं प्रथम तयार केले गेले. यापुढचं महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं ते अमेरिकेत. तिथं बेन्जामिन फ्रॅन्कलिन याला दूरवरचं पाहण्यासाठी आणि वाचण्यासाठी अशा दोन चष्म्यांचा वापर करावा लागत असे. वारंवार त्यांची अदलाबदल करायला तो कंटाळला. तेव्हा त्यानं त्या दोन्ही चष्म्यांच्या काचा अर्ध्यावर कापून एकमेकींना जोडून टाकल्या. अशा रीतीनं पहिला बायफोकल चष्मा अस्तित्त्वात आला.
पनीरचे गुलाबजाम
पनीरचे गुलाबजाम
साहित्य : शंभर ग्रॅम पनीर (दोन कप
दुधात अर्धा लिंबू पिळून शंभर ग्रॅम पनीर
होतं) दोनशे ग्रॅम खवा, एक वाटी मैदा, अर्धा
चमचा खायचा सोडा, दोन चमचे बारीक रवा,
चमचाभर तूप, पाच चमचे (पाव वाटीपेक्षाही
थोडी जास्त) पिठीसाखर, तळायला रिफाईंड
तेल.
पाकासाठी – तीन वाट्या साखर, दीड
वाटी पाणी, अर्धा चमचा वेलदोडा पूड.
कृति : पनीर व खवा किसून घ्यावा.
त्यातच तूप, सोडा, पिठीसाखर, मैदा हे सर्व
घालावं. खूप मळून मऊ करावं. मग लहान
लहान गोळे करून मंद आचेवर तळावे.
पाक – साखरेत पाणी घालून उकळी
येऊ द्यावी. उकळी आल्यावर गॅस बारीक
करून पाच मिनिटं पाक उकळू द्यावा व मग
त्यात वेलदोडा पूड घालून त्यात गुलाबजाम
सोडावे व मुरू द्यावे.
वास्तू
दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर
व त्याच्याबरोबर मागच्या बाजूला दोन्ही
ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवावी. काही
दुकानदारांच्या दुकानात केवळ बाहेरच्या
बाजूला गणपतीची मूर्ती ठेवलेली असते. या
मूर्तीमुळे दुकानात येणार्या-जाणार्या बाहेरच्या
व्यक्तींना लक्ष्मीचा लाभ होतो. दुकानदाराला
नव्हे. कारण गणपतीची मूर्ती हे अमृताचे,
तर पाठ हे दारिद्य्राचे प्रतीक समजले जाते.
दुकानाच्या बाहेरील बाजूला गणपतीची मूर्ती
लावल्यामुळे गणपतीची पाठ दुकानाकडे होते.
त्यामुळेच लक्ष्मी येण्याच्या वाटेत अडथळे
निर्माण होतात. हे टाळण्यासाठी दुकानाच्या
बाहेरील बाजूच्या मूर्तीबरोबरच मागे आतील
बाजूसही गणपतीचीमूर्ती असावी.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
हसा आणि शतायुषी व्हा!
स्थळ पाहायला मुलीकडचे मुलाकडे आलेले असतात
मुलीकडचे : आपण काय शिकला आहात?
मुलगा : ‘MF IAS’
मुलाकडच्यांनी आपल्याला अशिक्षीत समजू नये म्हणून
मुलीकडच्यांनी मुद्दामच डिग्रीच्या बाबतीत काही विचारले नाही.
लग्न झाल्यावर…मुलीने मुलाला विचारले,
ही ‘MF IAS’ ही डिग्री कशाची आहे.
मुलगा : Matric Fail in All Subject’s
दैनिक पंचांग रविवार, दि. २ जून २०२४
अपरा (स्मार्त) एकादशी, शके १९४६
क्रोधीनामसंवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, रेवती
२५|४०
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.
राशिभविष्य
मेष : आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल.
वृषभ : आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. निश्चितेने काम कराल. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. अडकलेल्या कामात सुधारणा होईल.
मिथुन : अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. पारिवारिक वाद विकोपास जातील. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगताल.
कर्क : वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील.
सिंह : व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्या वाढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.
कन्या : आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांरसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल.
वृश्चिक : अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वेळ सत्कारणी लागेल.
धनु : अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील.
मकर : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
कुंभ : नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. अनपेक्षित फायदा करून देणार्यू काही घटना घडतील. सामाजिक यश.
मीन : अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्यांयवर थोपू नका. वेळेच महत्व समजावून घ्याल. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही. आनंदाची बातमी मिळण्याची शयता आहे. आरोग्य उत्तम राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
किमान तापमान किती असू शकतं?
किमान तापमान किती असू शकतं?
तापमान हे उष्णता मोजण्याचे एक साधन आहे. जेवढी उष्णता जास्त तितके तापमान जास्त असे त्याचे सर्वसाधारण नाते सांगता येईल. पण कोणत्याही पदार्थाची उष्णता ही वास्तविक त्याच्या ठायी असलेल्या गतिज उर्जेवर अवलंबून असते. आता एखादा पदार्थ एका जागी स्थिर असला तर त्याच्या ठायी असलेली गतिज उर्जा किमान असेल, असे आपण म्हणू. तेव्हा अशा स्थिर असलेल्या पदार्थाचे तापमान किमान असायला हवे असे म्हणता येईल. ते तसे खरे असले तरी अर्धसत्य आहे. कारण तो पदार्थ गतिमान नसला तरी तो ज्या अणूंचा बनलेला असतो ते काही एका जागी निपचित पडून राहिलेले नसतात. स्वस्थ नसतात. त्यांच्या अंतर्गत खळबळ चालूच असते. त्यांची आंदोलने चालूच असतात. या आंदोलनापायी त्यांच्या ठायी काही उर्जा असते. या उर्जेचेच मोजमाप त्या पदार्थांच्या तापमानात केले जाते. त्यामुळे एखादा पदार्थ त्याच्या आसपास असलेल्या वातावरणाइतकंच तापमान धारण करून असतो तेव्हा तो स्थिर आहे, असे आपण म्हणतो. कारण त्याच्या अणूंच्या आंदोलनापायी त्याच्या ठायी असलेली ऊर्जा तेवढीच असते; पण जर ती ऊर्जा वाढली, म्हणजेच त्याचे अणू जास्त धसमुसळेपणाने आपली आंदोलने करू लागले तर त्याच्या ठायी असलेली गतिज ऊर्जा वाढते. साहजिकच त्याचे तापमान चढते. ही वाढीव आंदोलने त्या पदार्थाला बाहेरून पुरवलेल्या उष्णतेपायी होणारी असू शकतात.
म्हणून मग तो पदार्थ तापवला, की त्याचे तापमान चढत जाते. उलट दिशेला जर ही आंदोलने कमी होतील, त्यांच्यावर काही निर्बंध येतील अशी परिस्थिती निर्माण केली तर त्याच्या ठायीची अंतर्गत गतिज ऊर्जा कमी होते म्हणजेच त्याचे तापमान घटते. त्याच्या ठायी असलेली ऊर्जा काढून घेण्याची व्यवस्था केली तर त्याचे तापमान कमी होत जाईल. साधारणपणे पदार्थ गोठला की त्याचे तापमान किमान व्हायला हवे, असे आपण म्हणू; पण ते बरोबर नाही. कारण पदार्थ गोठला म्हणजे घन झाला तरी त्याच्या अंतरंगातील अणूंमधली आंदोलनेे पूर्णपणे थांबत नाहीत. ती जेव्हा पूर्णपणे थांबतील तेव्हाच त्याच्या ठायीची गतिज ऊर्जा शून्यवत होईल. त्या वेळीच मग त्याचे तापमान किमान पातळीला पोहोचेल. लॉर्ड केल्विन या वैज्ञानिकाने हे सिद्ध केले होते, की उणे २७३ या तापमानाला अणूंच्या अंतरंगातली आंदोलने संपूर्णपणे थांबतात. त्यांच्या ठायीची अंतर्गत गतिज ऊर्जा शून्यवत होते. त्यामुळे या विश्वातले ते किमान तापमान आहे. त्यालाच शून्य केल्विन किंवा अॅब्सोल्यूट झीरो असे म्हटले जाते.
कोबी वडा
कोबी वडा
साहित्य : कोबीची ८ पाने, ४
उकडलेले बटाटे, अर्धा कप उकडलेले मटार,
१ लहान चमचा चाट मसाला, १ कप बेसन,
१ चमचा मिरची पूड, अर्धा चमचा सोडा,
१-२ हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार,
तळण्यासाठी तेल.
कृति : कोबीची पाने गरम पाण्यात
उकळून घ्यावीत. बेसनामध्ये मीठ, सोडा,
मिरची पूड टाकून मिश्रण बनवून घ्यावे.
बटाटे कुस्करून त्यात मटार, चाटमसाला,
हिरव्या मिरच्या बारीक चिरून व मीठ टाकावे.
हे मिश्रण उकडलेल्या कोबीच्या पानात टाकून
रोल बनवावेत. हे रोल बेसनात बुडवून गरम
तेलात सोनेरी रंगावर तळावेत.
सौंदर्यलिंबाच्या पावडरचा फेसवॉश
सौंदर्यलिंबाच्या पावडरचा फेसवॉश
* लिंबूच्या सालीत व्हिटॅमिन सी
भरपूर प्रमाणात आढळले जाते. त्याच्या साली
सुकवून त्याची पावडर बनवा. एक चिमूटभर
पावडर फेसपॅकमध्ये घालून ती लावल्यास
त्वचा उजळली जाते.
* केळीच्या गरामध्ये मधाचे काही थेंब
टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना
लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून घ्या.
केस चमकदार होतील.








