श्री हनुमंत रायांनी समाजाला भक्तीची दिशा शिकवली : ह. भ. प. प्रांजलताई जाधव

0
305

नगर – वारकरी संप्रदायाचा व स्वराज्याचा भगवा ध्वज आपण पाहिल्यानंतर आपल्याला नेहमीच ऊर्जा निर्माण हाेते. आजच्या युवा पिढीला धार्मिकतेचे धडे द्यावेत श्री हनुमंत रायांनी समाजाला भक्तीची दिशा शिकवली आई- वडिलांची सेवा ही ईश्वर सेवा असून ती प्रत्येकाने करावी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल हे गेल्या 35 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयाेजन करत आहे. त्यामुळे समाजामध्ये एकाेपा निर्माण हाेऊन विचाराची देवाणघेवाण हाेत असते असे प्रतिपादक ह.भ.प. प्रांजलताई जाधव यांनी केले. नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने ह.भ.प. प्रांजलताई जाधव यांचे कीर्तन झाले. यावेळी नालेगाव ग्रामस्थ उपस्थित हाेते. नालेगाव येथे श्री हनुमान जयंती निमित्त आयाेजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रांजलताई जाधव या वारकरी मुलीने वयाच्या अवघ्या 18 वर्षामध्ये आध्यात्मिक व धार्मिकतेचे धडे घेऊन कीर्तन रुपी सेवा केली. यावेळी स्राेत्यांच्या वतीने या वारकरी मुलीचे काैतुक करत तिच्या कीर्तनाला साथ दिली परिसरामध्ये आनंदीमय वातावरण निर्माण झाले हाेते, असे मत दत्तात्रय मुदगल यांनी व्यक्त केले.