बसस्थानकातून पाणबुडी मोटार गेली चोरीला

0
23

शेतकर्‍याने नगरच्या बाजार समितीतील दुकानातून खरेदी केलेली ११ हजार रुपये किमतीची विहिरीत बसवायची पाणबुडी मोटार माळीवाडा बसस्थानकातून चोरीला गेल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली आहे. याबाबत शेतकरी किसन लहानू भांड (रा. धोत्रे, ता.पारनेर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भांड हे शेतातील विहिरीत पाणबुडी मोटार बसविण्यासाठी ती खरेदी करण्यासाठी नगरमध्ये आले होते. मोटार घेवून ते बसस्थानकावर गावाकडे जाण्यासाठी गेले होते. त्यावेळी बसस्थानकातून मोटार चोरीला गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भा.दं वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.