आनंदधामच्या प्रांगणात आनंद बाल संस्कार शिबिराला प्रतिसाद

0
141

एकत्र येण्यातून मुलांनी गिरवले सहजीवनाचे धडे, ५५० मुलामुलींचा सहभाग

नगर – मुलांवर याेग्य वयात चांगले संस्कार केल्यास त्यांचा सर्वांगीण विकास हाेवून ते भविष्यात आदर्श बनू शकतात. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या आशिर्वादाने आणि प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने अशीच आदर्श, सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी धार्मिक परीक्षा बाेर्ड अंतर्गत जैन साेशल ेडरेशनच्यावतीने आनंदधाम येथे आनंद बाल संस्कार शिबिर घेण्यात येत आहे. यावर्षी सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत शिबिर झाले. जवळपास 550 विद्यार्थी यात सहभागी झाले हाेते. 40 वर्षांपासून शिबिराचा उपक्रम चालू आहे. संस्कार शिबिरावेळी आनंदधामचे पवित्र प्रांगण मुलामुलींच्या किलबिलाटाने गजबजून गेल्याचे पहायला मिळाले. शिबिरात जैन साधू साध्वींच्या सान्निध्यात मुलांवर धार्मिक संस्कार करण्यात आले तसेच जैन धर्माचे मर्म मुलांना अतिशय साध्यासाेप्या भाषेत शिकवण्यात आले. सामूहिक प्रार्थनेने शिबिराचे सत्र सुरु सुरु झाल्यावर याेगा, ध्यानधारणा, धार्मिक अभ्यास यानंतर विश्रांती घेण्यात आली. याकाळात विद्यार्थ्यांना एकत्रित अल्पाेपहार दिला गेला. यानंतर मुलांना ब्रेन जिम एक्सरसाईज शिकवली गेली.

मुलांच्या शारीरिक व बाैद्धिक विकासाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. आदर्शऋषीजी महाराज यांनी दरराेज या मुलांशी प्रेमळ हितगुज साधत मार्गदर्शन केले. खाऊ वाटप आणि महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा.यांच्या मंगलपाठाने राेजच्या शिबिराची सांगता हाेत हाेती. शिबिर सांगतेप्रसंगी मर्चंटस् बँकेचे संचालक आनंदराम मुनाेत यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. शिबिरात प्रणव गांधी याेगाभ्यास करून घेतला. शिबिरासाठी सराेज कटारिया, सपना कटारिया, सीमा मुनाेत, निता बाेरा, बबिता गांधी, तनुजा भंडारी, सुवर्णा मुनाेत, नूतन गांधी, प्रतिभा गांधी, रेश्मा काेठारी, अपेक्षा संकलेचा, शाेभा गांधी, सारिका गुगळे, संताेष गांधी तसेच युवती सिमरन मुनाेत, महक डुंगरवाल, दिया मुनाेत, ईश्वरी चंगेडे, दिव्या काेठारी, रेश्मा चंगेडे, पायल पाेखरणा, सिया मुनाेत, प्रेरणा गुगळे, सुरभि गुंदेचा, मानसी गुगळे, प्रांजल छाजेड, करून बागरेचा, भाविका गुगळे, सिध्दी भंडारी, पलक गुंदेचा, श्रावणी चंगेडिया, सिध्दी गुंदेचा आदींनी परिश्रम घेतले.