कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांसह ६०० किलो गोमांस पकडले

0
41

नगर – कत्तलीसाठी छत्रपती संभाजी नगरकडे घेवून चाललेल्या गाेवंशीय जनावरांचा टेम्पाे स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. या टेम्पाे साेबत असलेल्या कारमधून 600 किलाे गाेमांसही पकडण्यात आले आहे. नगर तालुक्यातील जेऊर गावच्या शिवारात काेल्हुबाईचे काेल्हार गावाकडे जाणाèया रस्त्यावर मंगळवारी (दि.23) सकाळी ही कारवाई करण्यात आली. दाेन्ही वाहने व इतर असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे. पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पाे.नि. दिनेश आहेर यांनी गाेवंशीय जनावरांची कत्तल करुन गाेमांस वाहतुक व विक्री करणाèयांवर कारवाई साठी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव व अंमलदार संदीप पवार, सचिन अडबल, संताेष लाेढे, राेहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे व संभाजी काेतकर अशांचे पथक नेमलेले आहे. सदर पथक याबाबत माहिती घेत असताना या पथकास सलमान शेख हा 1 पांढरे रंगाचे स्विफ्ट कार व आवाईज कुरेशी हा त्यांचेकडील 1 पिकअप मधुन जेऊर (ता. नगर) येथुन संभाजीनगर कडे गाेमांस व जिवंत जनावरे कत्तल करण्यासाठी घेवुन जाणार आहे.

अशी माहिती मिळाल्याने पथकाने जेऊर गांवात काेल्हुबाईचे काेल्हार कडे जाणारे राेडवर चाैकामध्ये सापळ लावुन थांबले.थाेड्याच वेळात जेऊर गावाकडुन पथकाचे दिशेने संशयीत वाहने येताना दिसली. पथकाची खात्री हाेताच पांढरे रंगाचे स्विफ्ट कार व पिकअप चालकास थांबण्याचा इशारा केला असता दाेन्ही चालकांनी वाहने थांबविली. दाेन्ही चालकांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सलमान अजीज शेख (वय 28, रा. घासगल्ली, काेठला मैदान, अहमदनगर) व आवाईज सलीम कुरेशी (वय 20, रा. कुरेशी माेहल्ला, जेऊर, ता. नगर) असे सांगितले. दाेन्ही वाहन चालकांचे ताब्यातील वाहनांची पहाणी करता त्यामध्ये गाेमांस व गाेवंशीय जिवंत जनावरे मिळुन आली. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 600 किलाे वजनाचे गाेमास, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 6 माेठी जिवंत जनावरे, 5 लाख रुपये किंमतीचा 1 पिकअप व 4 लाख रुपये किंमतीची 1 स्विफ्ट कार असा एकुण 12 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.