महावीर जयंतीला सुमधुर भक्तीगीतांनी आनंदधाम परिसर मंत्रमुग्ध

0
46

डॉ.श्रध्दा व सृष्टी जगताप यांच्या सुरेल सुरांना उपस्थितांची दाद

नगर – जैन साेशल फेडरेशनच्यावतीने भगवान महावीर स्वामी जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी आयाेजित भक्तीसंध्या कार्यक्रमातील समधुर गीते, भजनांमुळे वातावरण प्रुल्लित बनले हाेते. इंदाैर येथील गायिका डाॅ.श्रध्दा जगताप व सृष्टी जगताप या आई व मुलीच्या जाेडीने एकाहून एक सरस गीते सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जगताप यांच्या जादूई आवाजाची माेहिनी उपस्थितांना पडली. भगवान महावीर स्वामी जयंतीनिमित्त दरवर्षी जैन साेशल फेडरेशनर्ते आनंदधामच्या प्रांगणात प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी यांच्या प्रेरणेने भक्तीसंध्येचा कार्यक्रम घेण्यात येताे. यंदाही या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. जगताप मायलेकीच्या ऐ मालिक तेरे बंदे हम, ओ पालन हारे, कृपा अपनी सदा, जय जय हे त्रिशला नंदन, जन्मे है महावीर प्यारे, सत्यम शिवम सुंदरम, इक राधा इक मीरा, गणनायकाय गणदैवताय, ज्याेत से ज्याेत जगाते चलाे, तू प्यार का सागर है, ऐरणीच्या देवा तुला, जय बाेलाे महावीर स्वामी की, मेरी लगी गुरु संग प्रीत अशा गीतांना वातावरण भारावून गेले हाेते. उपस्थितांना खिळवून ठेवणारे जादूई सूर, संगीत कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये ठरले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाचा अभिमान जागृत झाला. या भक्तीसंध्या कार्यक्रमात आपल्या अद्भूत कलेने रंग भरणाèया डाॅ.श्रध्दा व सृष्टी जगताप यांचा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अनिता सचिन भंडारी, पल्लवी अमाेल पटवा, वैशाली राजेंद्र गांधी, आनंद बाेरा, गिरीश शिंगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी जैन साेशल फेडरेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.