विचार भारतीच्या जनसंवादामुळे नगरच्या नव्या विकासास चालना मिळेल

0
92

नगर – विचार भरतीच्या वतीच्या पुढाकारातून शहराच्या विकासाच्या नवनवीन संकल्पनांचे संकलन करत पुढील पाच वर्षाची विकासाची ब्लू प्रिंट तयार केली आहे. जनतेच्या मनातील हा विकासाचा आरखडा आहे. त्यामुळे हा विकासाचा आराखडा प्रत्यक्षात आणून जनतेच्या अपेक्षा पूर्ती करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. विचार भारतीच्या जन संवाद व्यासपीठामुळे नगरच्या नव्या विकासास नक्कीच चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. समाज प्रबाेधन व परिवर्तनासाठी काम करणाèया विचार भारती या संस्थेच्या वतीने लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात जन संवाद उपक्रम राबवल. या अभियानात शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञांच्या विकासाच्या नवनवीन संकल्पनांचे संकलन करून तयार केलेला विकासाचा आराखडा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे यांच्याकडे विचार भारतीच्या प्रवर्तक रवींद्र मुळे व अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी सुपूर्द केला. यावेळी विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे, उपाध्यक्ष अनिल माेहिते, सहसचिव महेंद्र जाखेटे आदीं उपस्थित हाेते. यावेळी अरविंद पारगावकर यांनी उपस्थित नागरिकांना देशाच्या विकासाच्या वाटचालीत नगरला याेग्य स्थान मिळवून देण्यासाठी तनमनधनाने प्रयत्नशील राहण्याची सामूहिक शपथ दिली. विचार भारतीने आराखड्यात केलेल्या सूचनांचा धागा पकडून ना. विखे म्हणाले, जिल्ह्याचे नामांतर आता अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नगरमध्ये अहिल्यादेवींचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य स्मारक हाेण्याच्या सर्वांच्या मागणीची पूर्तता करून नगरच्या पर्यटनास चालना देणार आहे. तसेच 21 एप्रिल या अहिल्यादेवींच्या जयंती दिनानिमित्त एका नव्या सांस्कृतिक कला महाेत्सवाची सुरवात विचार भारतीने करावी. नगरमध्ये आता एमआयडीसीत 600 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. येथे नवीन माेठ्या उद्याेजकांना आकर्षित करून येथे माेठे प्रकल्प आणणार आहाेत. वाडियापार्क क्रीडा संकुलही आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणे आवश्यक आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन; देशाच्या विकासाच्या वाटचालीत नगरला योग्य स्थान मिळवून देण्याची शेकडो नगरकरांची शपथ

नॅशनल स्कूल ऑ\ ड्रामाची एखादी शाखा नगरला आणता येते का हेही पाहू. तसेच अद्यावत नाट्यगृह उभारण्याची जबाबदारीही मीच घेताे, असे सांगून विकासाचा नवा आराखडा तयार करण्यासाठी विचार भारतीने भरपूर मेहनत घेतल्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे. डाॅ.सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामंचा सविस्तर लेखाजाेखा यावेळी मांडला. त्यांनी मांडलेले विकास कामांचे पैलू पाहून उपस्थित नगरकर अचंबित झाले. विचार भारतीने सुचवलेले विकासाले सर्व कामे येत्या पाच वर्षात पूर्ण करणारच असे सांगून येत्या पाच वर्षात आपले नगर परिपूर्ण विकसित झालेले दिसेल असे आश्वासित केले. प्रास्ताविकात सुधीर लांडगे यांनी विचार भारतीने आजपर्यंत राबवलेल्या प्रबाेधनात्मक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्ष अनिल माेहिते यांनी जन संवाद उपक्रमाच्या उद्देशा मागची भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशाेकराव गायकवाड यांनी केले. मनाेज झंवर यांनी सर्वांचा परिचय करून दिला. आभार यांनी अंकुश गाेळे मानले. यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर, डाॅ.अभिजित पाठक, चित्रपट निर्माते बलभीम पठारे, छत्रपती पुरस्कार विजेते निर्मल थाेरात, कमलेश भंडारी, सिए सानित मुथा, व्यापारी असाेसिएशनचे राजेश झंवर, विनायक देशमुख, अनंत देसाई आदी उपस्थित हाेते.