केडगाव जैन स्थानक परिसराचे सुशोभीकरणासाठी सहकार्य करू : उद्योजक सचिन कोतकर

0
102

केडगावमध्ये मोठ्या संख्यने जैन समाजाचे वास्त्याव्य आहे. येथील जैन स्थानाकाच्या माध्यमातूनही चांगले धार्मिक कार्य होत असते. सर्व जातींचे नागरिक येथील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. केडगावच्या जैन स्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी पेविंग ब्लॉक बसवणे व येथे सभामंडप उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले. केडगाव येथे भगवान महावीर स्वामींच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा ताराबाग ते जैनधार्मिक स्थानक पर्यंत काढण्यात आली. शोभायात्रेत समाजातील नागरिक उत्साहात सहभागी झाले होते. या निमित्ताने सर्वांसाठी पाण्याची व थंडगार शरबतची व्यवस्था तसेच गौतमप्रसादची व्यवस्था करण्यात आली होती. महावीर जन्मोत्सवानिमित्त जैन स्थानकामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व जैन साध्वींचे आशीर्वचन झाले. यावेळी उद्योजक सचिन कोतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जैन श्रावक संघाचे फुलचंद चंगेडिया, पोपटलाल शिंगवी, प्रकाश मालू व बाबू चोरडिया यांच्या हस्ते सचिन कोतकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी युवक संघाचे प्रकाश चंगेडिया व अतुल शिंगवी यांनी जैन स्थानक परिसारत पेविंग ब्लॉक बसवणे व सभामंडप उभारणे आवश्यक असल्याचे सचिन कोतकर यांना सांगितले. या विनंतीला मान देऊन कोतकर यांनी त्वरित संदीप उद्योग समूहाच्या वतीने पेविंग ब्लॉक साठी दहा लाख रुपये मंजूर करून खासदारांच्या सहकार्याने सभामंडपही देण्याचा शब्द दिला. तसेच केडगाव व परिसराच्या विकासासाठी सर्वांनी भाजपचे खासदार सुजय विखे यांच्यामागे उभे राहून त्यांना विजयी करावे, असेही आवाहन सचिन कोतकर यांनी केले. यावेळी राहुल शिंगवी, विपुल कांकरिया, आनंद कटारिया, कमलेश गुंदेचा, राजेंद्र शिंगवी, अतुल शिंगवी, संतोष शेटीया, रुपेश गुगळे, राहुल शेटीया, जितेंद्र पोखरणा, धीरज चोरडिया, पारस शेटीया, कमलेश फिरोदिया, पीयूष बाफना, कुशल भंडारी, ललित गुगळे, रोशन चोरडिया, कमलेश पोखरणा, संतोष फिरोदिया आदींसह युवक, महिला व नागरिक उपस्थित होते.