दिलदारसिंग बीर यांचा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा शिवसेनेत प्रवेश

0
336

नगर – सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले दिलदारसिंग बीर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीर यांनी शिवबंधन बांधले. नगर दक्षिण लाेकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी काढलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची नगर शहरात गांधी मैदानावर सांगता झाली. या कार्यक्रमात बीर यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी महाविकास आघाडीचे खा. शरद पवार, आ. बाळासाहेब थाेरात, आ. राेहित पवार, जिल्हा प्रमुख शशीकांत गाडे, युवा सेनेचे विक्रम राठाेड, माजी आमदार राजेंद्र आवळे, भूषणसिंह हाेळकर, राजेंद्र ाळके, भगवान फुलसाैंदर, प्रताप ढाकणे, संभाजी कदम, बाळासाहेब बाेराटे, किरण काळे, दत्ता जाधव, अभिषेक कळमकर, याेगीराज गाडे, किरण काळे, सतीश बल्लाळ आदी उपस्थित हाेते. दिलदारसिंग बीर यांनी माजी मंत्री स्व. अनिल राठाेड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करुन आपल्या सामाजिक व राजकीय कारकीरर्दिची सुरुवात केली. 26 जानेवारी 2002 राेजी बागडपट्टीत पहिली शिवसेनेची शाखा सुरु केली.

त्याचप्रमाणे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीर यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सर्वसामान्य नागरिक व युवकांशी जाेडले गेले. शिवसेनेत शाखाप्रमुख ते उपशहरप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न हाताळून शिवसेना वाढविण्याचे काम केले. 2013 मध्ये ते राष्ट्रवादीत गेले. 10 वर्ष राष्ट्रवादीत शहर जिल्हा उपाध्यक्ष व सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली. मात्र पुन्हा त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत पुन्हा सन्मानाने काम करण्याची संधी मिळाली आहे. पूर्वीपासूनच स्व. अनिल राठाेड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक म्हणून कार्य केले. राजकारण व समाजकारणाच्या कार्याला शिवसेनेत दिशा मिळाली व माेठा जनसंपर्क निर्माण झाला. ज्या शिवसेनेतून सुरुवात झाली, त्या शिवसेनेतच शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करत राहणार असल्याचे दिलदारसिंग यांनी म्हटले आहे.