सावेडी उपनगरात भटक्या डुक्करांचा उपद्रव

0
36
oplus_32

 

नगर शहरात मोकाट कुत्रे, जनावरे यांचा प्रश्न ज्वलंत असतानाच आता उपनगराच्या प्रभाग क्र.१, २, ४ मधील गावडे मळा, तवलेनगर, कोहिनूर परिसरात भटया डुक्करांचा उपद्रव वाढला आहे या बरोबरच शहरातील काही अन्य भागांतही डुकरांचा त्रास नागरिकांना होतो. या भागातील डुक्कर(वराह) पालन करणार्‍या व्यावसायिकांचे शहराबाहेर पुर्नवसन करण्याची गरज आहे. रस्त्यावरील कचरा आवाराचा वेळेवर उठाव होत नसल्याने डुकरे त्याठिकाणी ठाण मांडून राहतात. तरी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील उपद्रवकारक भटकी, मोकाट डूक्करे यांना अटकाव करणे व त्यांची शहराबाहेर व्यवस्था लावण्याची मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.