घराच्या खिडकीचे गज वाकवून चांदीची मूर्ती, इतर वस्तूंसह रोकड चोरट्यांनी पळविली

0
15

नगर – राहते घराचा किचनचा बंद दरवाजा व त्यालगत असलेल्या खिडकीच्या काचा फोडुन, गज वाकुन त्याद्वारे आत प्रवेश करुन चोरट्यांनी घरातील चांदीची दत्तांची मूर्ती, पूजेचे ताट, इतर साहित्य व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील चैत्रबन कॉलनीत घडली. याबाबत श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी (वय ६३, रा. तीर्थरूप बंगला, चैत्रबन कॉलनी, गुलमोहर रोड) यांनी मंगळवारी (दि.१६) दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सेवानिवृत्त असून अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.१४) रात्री ११ ते सोमवारी (दि.१५) सकाळी ६.३० या कालावधीत त्यांचे राहते घराचा किचनचा बंद दरवाजा व त्यालगत असलेल्या खिडकीच्या काचा फोडुन, गज वाकुन त्याद्वारे आत प्रवेश करुन चांदिचे वस्तु, घरगुती वापराचे तांब्याचे भाडे व ईतर वस्तु, तसेच रोख रक्कम ५ हजार रुपये असा एकूण १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.