वसंत राठोड यांच्या वाहनाची तोडफोड करणाऱ्यांना अटक करून कारवाई करा

0
26

श्री वर्धमान श्रावक संघाकडून घटनेचा निषेध; भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याला निवेदन

नगर – भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांच्या वाहनाची तोडफोड करणार्‍या आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन श्री वर्धमान श्रावक संघ भिंगारच्यावतीने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे. यासंदर्भात संघाचे अध्यक्ष विलास मुनोत व उपाध्यक्ष सुंदरलाल भंडारी यांनी निवेदनात म्हटले आहे की, वसंत चांदमल राठोड हे सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करणारे व्यतिमत्व आहे. गेल्या कित्येक वर्षापासून भिंगार व नगर शहरात राजकिय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांच्या कामामुळे सर्वच समाजातील लोकांबरोबर त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राठोड यांच्या घरासमोर लावलेल्या वाहनावर अज्ञात लोकांनी दगडफेक करून काचा फोडल्या व गाडीचे नुकसान केले. सदर घटना अत्यंत निंदनीय व निषेधार्थ असून, प्राथमिक तपासात सदर कृत्य हे जाणिवपूर्वक व हेतूपुरस्सर केल्याचे सिसिटिव्ही फुटेजवरुन दिसत आहे. सकल जैन समाज सदर घटनेचा निषेध करत असून, घटनेतील आरोपींचा तत्काळ शोध घेवून अटक करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. निवेदनावर संपत गांधी, शैलेश मुनोत, सचिन गुंदेचा, विशाल बोथरा, रोशन चंगेडिया, निलेश गांधी, पंकज गांधी, अतुल मुनोत, आनंद गांधी, यश शिंगवी, आनंद बोथरा, मयुर भंडारी, शांतीाल मुनोत, संजय मुनोत, मनोज मुनोत आदींच्या सह्या आहेत.