जय आनंद महावीर युवक मंडळाच्या सदस्यांनी घेतली सामूहिक शपथ

0
18

नगर – संपूर्ण सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास ७५ वर्षे लोकशाहीची परंपरा देशाने कायम राखली आहे. गुप्त मतदान पद्धतीने १८ वर्षांवरील नागरिक आपला लोकप्रतिनिधी संसदेत अथवा विधीमंडळात पाठवतात. आताही देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरमध्ये १३ मे रोजी मतदान होणार असून प्रत्येकाने आवर्जून मतदान करून लोकशाहीतील महत्वाचे कर्तव्य बजावले पाहिजे असे प्रतिपादन जय आनंद महावीर युवक मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय आनंद महावीर युवक मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येत मतदान करण्याची सामूहिक शपथ घेतली. यावेळी सदस्य बाबालाल गांधी, ललित बनभेरू, आकाश गांधी, सत्येन मुथा, मनोज गुंदेचा, कुंतीलाल राका, विनोद भंडारी, प्रमोद डागा, हेमंत मुथा, शरद मुथा, योगेश मुनोत, सुरेश गांधी, सचिन कोठारी, अमित गांधी, प्रमोद गांधी उपस्थित होते.

भारतीय लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार दिला आहे. जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबत असते. लोकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराने लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आपले मतदान आपल्या पसंतीच्या उमेदवारास केले पाहिजे. यादृष्टीने समाजात व्यापक जनजागृती करण्याचा संकल्पही युवक महिला सदस्यांनी केला आहे.