शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या मैदानाच्या कडेला कचर्याचे साम्राज्य पसरले असून मोठे गाजर गवत आलेले आहे. अनेक ठिकाणी काटेरी झुडपे उगवली आहे तसेच पावसाच्या पाण्याच्या नाल्या ही प्लास्टिक, कचरा, मातीने भरल्या आहेत. प्रेक्षक गॅलरीवरही मोठ्या प्रमाणावर धूळ साचली आहे. प्रेक्षक गॅलरीमधील स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छता असते. तसेच सायंकाळी मैदानावर तसेच मैदानाबाहेरही प्रकाशाची व्यवस्था अपुरी आहे. काही आऊटगेटच्या भागामध्ये अतिक्रमण ही झालेले आहे. या समस्या निवारण करून स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावे अशी मागणी येथे क्रीडाप्रेमींनी केली आहे.