महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी सौरभ जोशी

0
38

उपायुक्तांच्या ३ रिक्त पदांवरही झाल्या नियुक्त्या

नगर – महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सौरभ जोशी, तर उपायुक्तपदी लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार व विजयकुमार मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशाप्रमाणे राज्यभरातील काही अधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात अहमदनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, अजित निकत व श्रीनिवास कुरे यांच्याही बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे ही पदे रिक्त झाली होती. दरम्यान, आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी या रिक्त पदावर सहायक आयुक्त अशोक साबळे, सपना वसावा, नगरसचिव मेहेर लहारे यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. परंतु आता शासन निर्देशाप्रमाणे महापालिकेला पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त मिळणार आहेत. त्यामुळे – महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला चालना मिळणार आहे.